NCT NCT बी ए भाग २ मध्ये प्रथम येणाऱ्या वैष्णवी कोळीचा सत्कार

बी ए भाग २ मध्ये प्रथम येणाऱ्या वैष्णवी कोळीचा सत्कार

 

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर{जालिंदर शिंदे }:- जनता शिक्षण संस्थेच्या बालगोपाळ शिशु विहार व महिला महाविद्यालय (आर्टस्, कॉमर्स,सायन्स), कवठेमहांकाळ येथे लोकनेते पंडीतराव जाधव (आण्णा) यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त शालेय गुणवत्ता पारितोषिक वितरण व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सन २०२५ मध्ये बी ए भाग २ मध्ये महाविद्यालयातून प्रथम क्रमांक आलेल्या कु वैष्णवी संजयकुमार कोळी हिचा या महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्राचार्य  इंगवले सर यांच्या हस्ते श्री महाकाली हायस्कूलच्या सेवानिवृत्त सहशिक्षिका श्रीमती शकुंतला नरसगोंडा पाटील यांनी पारितोषिक म्हणून रोख रक्कम देऊन तिला सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष संजयकुमार कोळी,अनुष्का कोळी,वर्गशिक्षिका कोळी मॅडम इतर मान्यवर उपस्थित होते. झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थिनीचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन  केले.