NCT NCT कवठेमहांकाळ तालुक्यातील रामपुरच्या बापू पाटोळे यांच्या द्राक्षेला उच्चांकी दराची सलामी

कवठेमहांकाळ तालुक्यातील रामपुरच्या बापू पाटोळे यांच्या द्राक्षेला उच्चांकी दराची सलामी

एस एस एन जातीच्या वाणाला ५७० रुपयेला चार किलो 

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी {रामचंद्र कोरे-माळी}:-रामपूर वाडी (ता.कवठे महांकाळ )येथील बापू तुकाराम पाटोळे यांच्या एस एस एन जातीच्या वाणाला ५७० रुपयेला चार किलो दराने उच्चंकी भावाची सलामी मिळाली असून प्रसिद्ध द्राक्ष व्यापारी आर पी फ्रुट चे अमोल पवार हातीद  व सहकारी विठ्ठल नांगरे पाटील, सावळज यांनी प्लॉटची खरेदी केली.                                                           यावर्षी द्राक्षाला चांगल्या दराने भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कवठे महांकाळ तालुक्यात नेहमीच आगाप छाटणी घेतली जाते त्या द्राक्षांच्या सर्व वाहनांच्या विक्रीसाठी उपलब्ध होऊ लागले आहेत. द्राक्ष व्यापारी थेट प्लॉटमध्ये जाऊन सौदा करत आहेत. सदरची द्राक्षे ही ११५ दिवसाची झाले असून अतिशय चांगल्या क्वालिटीची गोड द्राक्ष बनली आहेत. त्यामुळे मार्केटला गोड द्राक्ष मिळाल्यामुळे यंदा मार्केट ला द्राक्षाची चांगली मागणी राहील अशी चर्चा व्यापाऱ्यांमध्ये आहे.