नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी (रामचंद्र कोरे-माळी):-देशिंग, ता. कवठेमहांकाळ : येथील जगताप वस्ती येथील रहिवासी बापू चंद्रकांत जगताप (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जगताप परिवारासह देशिंग परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता जगताप वस्ती, देशिंग (मळ्यात) येथे होणार असल्याची माहिती नातेवाईकांच्या वतीने देण्यात आली आहे.
