नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी ((नेहाल हसन):- या व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणीनं मुंबईकरांचा लोकल ट्रेनमधील असुरक्षित प्रवास दाखवला आहे. महिलांसाठी विशेष गाड्या आहेत, पण या गाड्यांमध्ये पाऊल ठेवायलाही जागा नाही, अशी अवस्था झाली आहे. या व्हिडीओमधून रेल्वे व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. जर तुमच्याकडे टॅलेंट आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर मुंबई शहर तुमची अनेक स्वप्नं पूर्ण करतं. पण हा प्रवास काही सोपा नसतो. अनेकदा मुंबई लोकलनं प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. पुढील लिंक ओपन करुन पहा https://www.instagram.com/reel/DSPE4YcjGTT/?igsh=MXZrYXIxM29yZmw5NQ= याच पार्श्वभूमीवर एका तरुणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. "आमची मुलगी कामाला जाते" हे वाक्य आई-वडिलांना मोठ्या अभिमानानं म्हणता यावं, यासाठी मुलगी कसा संघर्ष करत प्रवास करतेय, हे तुम्ही या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता. जर तुम्ही मुंबईकर असाल, तर असे अनुभव तुम्हीही रोजच घेत असाल. पण जर तुम्ही मुंबईबाहेरचे असाल, तर हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ iamarchukute या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमधील तरुणी सांगते की, ती ठाणे स्टेशनवर उभी आहे. इतकी प्रचंड गर्दी आहे की तिला एकही ट्रेन पकडता येत नाहीये. गेल्या तासाभरात तिनं तीन ते चार ट्रेन सोडल्या आहेत, पण एकाही ट्रेनमध्ये तिला चढता आलं नाही.ती म्हणते, "आमची मुलगी सून कमवायला जाते, पण ती कशी जाते हे मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये दाखवणार आहे."तेवढ्यात स्टेशनवर महिला विशेष लोकल आली. मात्र, या ट्रेनमध्ये सुद्धा इतकी प्रचंड गर्दी होती की महिला अक्षरशः दरवाज्यावर लटकून प्रवास करत होत्या. या ट्रेनमध्ये देखील तिला चढता आलं नाही. ही गर्दी पाहूनच मुंबईकरांच्या दैनंदिन संघर्षाचा अंदाज येतो.
