NCT NCT परफेक्ट इंग्लिश स्कूल मध्ये 'वीरबालदिन' साजरा

परफेक्ट इंग्लिश स्कूल मध्ये 'वीरबालदिन' साजरा

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांच्या दोन साहेबजाद्यांनी (जोरावरसिंग व फतेहसिंग) यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण म्हणून साजरा केला जाणार 'वीरबालदिन' परफेक्ट इंग्लिश स्कूल कुची (ता कवठेमहांकाळ) मध्ये साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग होते.तर अध्यक्षस्थानी प्राचार्या रुपाली पाटील होत्या.                                  यावेळी बोलताना विलासराव काळेबाग पुढे म्हणाले की १७०५ मध्ये मुघल सैन्यानी पंजाब मधील आनंदपूर साहीबाला वेढा घातला असता गुरु गोविंद सिंग यांचे कुटुंब वेगळे झाले.यावेळी साहिबजादा जोरावर सिंग व फतेहसिंग यांना अनुक्रमे ७ व्या व ९ व्या वर्षी मुघलांनी पकडले व त्यांना इस्लाम धर्म स्विकारण्यास सांगितले.त्यावेळी या दोन मुलांनी त्यांना स्पष्ट नकार दिला असता त्यांना याच दिवशी मुघलांनी जिवंत भिंती मध्ये चिणले होते.त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या धर्मासाठी दिलेल्या सर्वोच्च बलीदानचे स्मरण म्हणून २६ डिसेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली असुन,हा दिवस साहस व निष्ठा दर्शवत असल्याचे सांगितले.                     यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग व अनिल लोंढे,भाजपा जिल्हा चिटणीस सुभाष खांडेकर, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष आझमभाई मकानदार,भाजपा तालुकाध्यक्ष उदय भोसले, सुमित कुलकर्णी,निखिल कांबळे,माऊली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनंजय शिंदे,सचिव नानासाहेब पाटील, प्राचार्या सौ रुपाली पाटीलसह शिक्षक, विद्यार्थी,शिक्षकोतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत प्रास्ताविक रुपाली पाटील यांनी तर आभार धनंजय शिंदे यांनी मानले.