नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर (जालिंदर शिंदे) :-शुक्राचा अस्त सुरु झाल्याने विवाह सोहळ्यांना विश्रांती मिळाली आहे.६ डिसेंबर ही शेवटची तिथी होती मात्र गौण काळानुसार रविवार १४ डिसेंबर रोजी अनेकांनी विवाह सोहळे उरकून घेतले.त्यामुळे यादिवशी तालुक्यात मोठया प्रमाणात विवाह आणि साखरपुडा सोहळे पार पडले.आता थेट फेब्रुवारीमधेच विवाह सोहळ्यांना प्रारंभ होणार असल्याने,विवाह सोहळ्यावर अवलंबून असलेल्यांना आता दीड महिन्याची विश्रांती मिळाली आहे. तुळशीचा विवाह झाल्यानंतर २२ नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्त सुरु झाले. अनेकांनी तिथी धरून लग्न सोहळे आटोपून घेतले.आता शुक्र ग्रहाच्या अस्तामुळे विवाह सोहळे थांबले आहेत. यामुळे एकीकडे विवाह समारंभांवर अवलंबून असलेल्यांच्यावर संकट निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे विवाहोच्छुकांना देखील मुहूर्त नसल्याने तब्बल दीड महिना ताटकळत रहावे लागणार आहे.शुक्राचा अस्त सुरु झाल्याने ३० जानेवारी पर्यंत विवाह सोहळे थांबले असल्याने गुरुजींसह, मंगल कार्यालये, लॉन्स, बँड, डेकोरेशन, केटरिंग, घोडी, आतषबाजी असे कितीतरी व्यवसायिकांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. मात्र दीड महिन्यानंतर ही तुट भरून निघेल असा अंदाज व्यावसायिकांना वाटत आहे. लग्नाळुंना आता दीड महिन्याची वेटिंग. यंदा नोव्हेंबर ते जुलै ५५ विवाह तिथी आहेत.आजपासून दीड महिना तिथी नसल्याने फेब्रुवारीत विवाह सोहळे सुरु होतील.फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक १२ तिथी आहेत.तर मार्च मध्ये ७,एप्रिल मध्ये ५,मे मध्ये ९, जूनमध्ये ६ तर जुलैमध्ये ८ विवाह सोहळ्यांच्या तिथी आहेत.दरम्यान दीड महिना वेटिंग असल्याने १४ डिसेंबर रोजी लग्नाळुंनी लग्न सोहळे आटोपून घेतले आहेत.रविवारी शहरात मोठ्या संख्येने विवाह आणि साखरपुडा समारंभ पार पडले. आता फेब्रुवारीपासून मुहूर्त लग्नासाठी ५ आणि ६ डिसेंबर ही शेवटची तिथी होती. तर गौण काळातील दोन तीन विवाह तिथी शिल्लक आहेत. आता १४ ते ३० जानेवारी या काळात शुक्राचा अस्त राहणार आहे.या काळात विवाह सोहळे केले जात नाहीत.त्यामुळे या काळात एकही लग्नाची तिथी नाही.
किशोरी संजय काळे
(स्वानंद ज्योतिष कवठेमहांकाळ)

