नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी{रामचंद्र कोरे-माळी}:-राबाडा:-नवी मुंबई महानगरपालिका संचलित पीएम श्री राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर रबाळे ,नवी मुंबई येथील क्रीडा शिक्षक प्राध्यापक अमोलकुमार वाघमारे व संगणक शिक्षिका सौ. सुप्रिया अमोलकुमार वाघमारे यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक जडणघडणीमध्ये महत्व पूर्ण योगदान दिल्याबद्दल ज्ञानदीप सेवा पुरस्काराने सन्मान माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. क्रीडा शिक्षक प्राध्यापक अमोलकुमार वाघमारे हे गेली 16 वर्षापासून शाहू महाराज विद्यालयांमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत क्रीडांगणावरील कवायत प्रकार, कवायत संचालन, कृतीयुक्त गीते, योगासन व विविध खेळांची प्रात्यक्षिका या सोबतच अध्यापनामध्ये मराठी हा विषय इ.९,१० वीच्या हिंदी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ते शिकवतात त्यांचा अध्यापनाचे कौशल्य अतिशय उत्तम आहे विद्यार्थ्यांना ते भावतं अधिक सोप्या पद्धतीने सांगण्याची त्यांची पद्धत विद्यार्थ्यांना आवडते. त्याचबरोबर पालक भेटीच्या माध्य मातून पालकांशी सुसंवाद साधून शाळाबाह्य व शाळेत न येणाऱ्या मुलांना शाळेविषयी रुची निर्माण करण्याचा प्रयत्न ही ते सातत्याने करत असतात पालक सभेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती,मतदार जनजागृती, पोलिओ लसीकरण, वृक्षारोपण, सर्वाइकल कॅन्सर या संदर्भात विद्यार्थी व पालकांना माहिती देऊन जागृती करण्याचं काम ते मनापासून करतात अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ही ते अतिशय उत्तम पद्धतीने करतात त्यांनी घडवलेले शेकडो विद्यार्थी आज रेल्वे, पोलीस ,आर्मी, इंजिनिअर, डॉक्टर त्याचबरोबर प्रशासकीय व खाजगी सेवेमध्ये नोकरी करत आहेत शाळेतील सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध अतिशय उत्तम आहेत शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुख दुःखातही ती आवर्जून सामील होतात त्यामुळे त्यांचा सन्मान या ज्ञानदीप सेवा पुरस्काराने करण्यात आला त्यांच्या सुविध्य पत्नी यासुद्धा याच शाळेमध्ये संगणक शिक्षिका म्हणून सिमेन्स एज्युकेशन व ऐक्य चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत आहेत त्याही गेली दहा वर्षापासून विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान देण्याचा उत्तम प्रयत्न करतात गुरुजी फाउंडेशन च्या माध्यमातून देशभरातील ५० शाळांचा सहभाग असलेल्या स्क्रॅच कोर्स या कोडींग बाबत प्रसिद्ध असलेल्या स्पर्धेमध्ये शाळेचे इयत्ता ७वी ८ वी चे विद्यार्थी उत्तम वक्तृत्व, वादविवाद ,त्याचबरोबर कोडींग चे प्रेझेंटेशन करण्यामध्ये तरबेज झालेले आहेत त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम सौ सुप्रिया वाघमारे करत आहेत ही सर्व मुले शाळेचा नावलौकिक राज्यभर करत आहेत म्हणून त्यांचाही ज्ञानदीप सेवा पुरस्काराने सन्मान करण्यात आला त्यांच्यासोबत शाळेतील ज्येष्ठ शिक्षक सदानंद वाघमारे, अभिमन्यू मोटे, मेथाजी देसाई, जया नगराळे, राजश्री उमराणीकर यांची विविध क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या ४ थी,५ वी, ७वी, ८ वी चे स्कॉलरशिप तसेच एन एम एम एस व होमी भाभा या परीक्षेमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक त्याचबरोबर मूल्यसंवर्धन, महा वाचन चळवळ सारथी, प्रशासकीय तत्परता व कार्य क्षमता गौरव विशेष कृतज्ञता सन्मान प्राप्त करणारे शिक्षक यांचाही गुण गौरव सोहळा नुकताच शाहू महाराज विद्यालयाच्या सुनील सोनी सभागृहामध्ये संपन्न झाला त्यामध्ये हा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, पालक ,कर्मचारी प्रभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका स्नेहल विशे, शाळा प्रमुख अविनाश जाधव, माध्यमिक विभाग प्रमुख रामराव कंदगुळे शाळा समन्वयक कमलेश इंगळे, सकाळ सत्र प्रमुख गीता घाडी, दुपार सत्र प्रमुख सनी पाटील यांच्यासह ज्येष्ठ शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अविनाश जाधव तर सूत्र संचालन प्रा अमोलकुमार वाघमारे यांनी केले शेवटी आभार कमलेश इंगळे यांनी मानले.

