काय आहे नागरिकांची तक्रार?
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र आणि राज्य सरकारकडून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत आणि १५ व्या वित्त आयोगातून लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायतीला येतो. मात्र हा निधी प्रत्यक्ष दलित वस्तीपर्यंत पोहोचतच नाही. याचा सर्वात मोठा फटका येथील स्मशानभूमीला बसला आहे.
स्मशानभूमीत आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे -
१) अंत्यविधीसाठी विजेची (लाईट) कोणतीही व्यवस्था नाही.
२) नातेवाईकांना बसण्यासाठी बाकडे नाहीत.
३) स्मशानभूमीची संरक्षण भिंत तुटलेली आहे.
४) पाण्याची व्यवस्था नाही.
परिणामी रात्री-अपरात्री अंत्यसंस्कार करायची वेळ आली तर ग्रामस्थांना अक्षरशः मोबाईलच्या टॉर्चच्या किंवा बॅटरीच्या उजेडात प्रेत जाळावे लागत आहे, अशी व्यथा ग्रामस्थांनी मांडली आहे.
शिवसेनेची आक्रमक भूमिका
या गंभीर विषयाची दखल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतली आहे. कवठे महांकाळ तालुका कामगार सेना तालुका प्रमुख सुमित भाऊ गाडे यांच्या अध्यक्ष तेखाली व कवठेमहांकाळ शिवसेना तालुकाप्रमुख मारुतीभाऊ पवार यांच्या मार्गदर्शना खाली या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. येत्या ८ ते १० दिवसात जर ग्रामपंचायतीने या स्मशान भूमीची दुरुस्ती, लाईट आणि बाकड्यांची व्यवस्था केली नाही, तर शिवसेना कामगार सेनेच्या वतीने कोकळे ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुमित भाऊ गाडे यांनी दिला आहे.दलित समाजाच्या मूलभूत हक्कांच्या ठिकाणीच असा भेदभाव होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
