नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर{जालिंदर शिंदे }:-राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शना खाली कवठेमहांकाळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त व गरजू कुटुंबांना 'आनंदाचा शिधा' या किटच शिवसेनेचे जिल्हा संघटक अमोल जाधव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या आनंदाच्या शिधामध्ये साखर तेल,रवा,चणाडाळ,पोहे,बेसनआदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. यावेळी बोलताना अमोल जाधव म्हणाले की, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या आनंदाचा विचार केला आहे. दुष्काळाच्या कठीण परिस्थितीतही कोणतेही घर सणासुदीला रिकामे राहू नये व प्रत्येकाच्या घरात गोडधोड पदार्थ व्हावे, हीच शिंदे साहेबांची भावना आहे. त्यांच्या संकल्पनेतील हा आनंदाचा शिधा आम्ही तालुक्यातील गरजूंना वाटप करत आहोत. दुष्काळग्रस्त परिस्थितीत मिळालेल्या या मदतीमुळे ग्रामस्थही समाधान व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अमोल जाधव यांचे आभार मानले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून अमोल जाधव यांच्या हस्ते दुष्काळग्रस्तांना 'आनंदाचा शिधा' वाटप
November 01, 2026