नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी{रामचंद्र कोरे-माळी}:-रक्तदान क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल येळावी गावचे सुपुत्र शुभम विश्वास पाटील यांना वर्ष २०२६ चा मानाचा 'नॅशनल अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले. बॉम्बे ब्लड ग्रुप इंडिया यांच्या वतीने या राष्ट्रीय पुरस्काराची प्रदान करण्यात आला. शुभम पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून रक्तदान क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः 40 पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले असून,ग्रामीण आणि शहरी भागात रक्तदानाविषयी जनजागृती करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 15 पेक्षा जास्त रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, त्या माध्यमातून हजारो रक्तपिशव्या गोळा करून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत झाली आहे. विशेषतः आणीबाणीच्या काळात आणि रक्ताचा तुटवडा असताना त्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन रुग्णांना रक्त उपलब्ध करून दिले आहे.हे संत निरंकारी मिशन चे अनुयायी असून सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या शिकवनीतून आध्यात्मिक जागृती बरोबर समाजाप्रती सेवेची भावना त्यांच्या मध्ये जागृत झाली.त्यांच्या याच निस्वार्थी आणि कौतुकास्पद कार्याची दखल घेऊन त्यांना हा 'नॅशनल अवॉर्ड २०२६' देऊन गौरविण्यात येत आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
