नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- घाटनाद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील जेष्ठ व प्रतिष्ठित महीला नागरिक श्रीमती सोनाबाई आत्माराम कोळी (वय-१००) यांचे वृद्धापकाळाने मंगळवार दिनांक २९ रोजी दुपारी दुःखद निधन झाले.त्या युवा नेते सतिश कोळी यांची आजी होत.त्यांच्या पश्चात एक मुलगा,चार मुली,सुना,जावाई व नातवंडे असा परिवार असुन,रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक ३१ रोजी सकाळी आठ वाजता घाटनांद्रे येथील स्मशानभूमीत घेण्यात आले आहे.
घाटनांद्रे येथील सोनाबाई कोळी यांचे दुःखद निधन
October 30, 2024
