NCT NCT कर्तृत्वाचा नंदादीप:-श्री संजय उत्तम बाबर (पर्यवेक्षक) लाहोटी कन्या शाळा कराड

कर्तृत्वाचा नंदादीप:-श्री संजय उत्तम बाबर (पर्यवेक्षक) लाहोटी कन्या शाळा कराड


नवचैतन्य टाईम्स वाई(प्रा.संभाजी लावंड)- 
१)स्वे स्वे 
कर्मण्याभिस्त लभते नर स्वतःचे काम श्रद्धापूर्वक केल्याने मनुष्य जास्त प्रवीण होतो.हे उद् गार सार्थ ठरतात. लाहोटी विद्यालय कराडचे पर्यवेक्षक श्री संजय उत्तम बाबर सर यांच्या बाबतीत अवघ्या महाराष्ट्रात वेगळी ओळख असलेल्या तालुक्यातील माणदेशातील तथा माण तालुक्यातील म्हसवड या गावी नैसर्गिक दुष्काळ असला तरी, शैक्षणिक बुध्दीमत्तेचा सुकाळ असलेला असा हा तालुका , अशिक्षित कुटुंबामध्ये  बाबर सरांचा जन्म झाला. बाबर सरांचा वडील कपडे विक्रीचा व्यवसाय करायचे. तीन भाऊ एक बहीण आणि आईवडील असे हे कुटुंब परिस्थितीवर मात करीत सरांनी आपले शिक्षण पूर्ण केले. पहिले ते दहावी पर्यंतचे शिक्षण गावी म्हसवड लाच घेतले. इ. ११वी १२ वी चे शिक्षण छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्यूनियर काॅलेज रेठरे तालुका कराड येथे(विज्ञान) शाखेतून घेतले.बी. एस, सी चे शिक्षण दहिवडी काॅलेज दहिवडी येथे घेतले तर, बी एड चे शिक्षण कराड येथे घेतले. बी एसी बीएड झाल्यानंतर मुलाखती साठी दोन ते तीन  ठिकाणाहून त्यांना  काॅलआले. मात्र सरांनी नोकरीसाठी  शिक्षण मंडळ कराडला  प्राधान्य दिले, १९९२ ला मुलाखतीने शिक्षण मंडळ कराडच्या टिळक हायस्कूल कराड येथे उपशिक्षक या पदावर रुजू झाले. संस्था प्रशासकीय सोयीसाठी त्यांची बदली आत्माराम विद्यामंदिर ओगले वाडी येथे झाली.
२) अध्यापन 
केलेल्या विषयातील विद्यार्थ्यांची प्रगती उल्लेखनीय रक्तापेक्षा ध्येयाचे नाते जवळचे मानून बहुजन 
समाजातील विद्यार्थ्यांच्या मनातील तळमळ जाणली. त्यामुळे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून नावारूपास आले. कृती हा जीवनाचाआत्मा आहे हे प्रमाण मानून शिक्षण मंडळ कराडच्या तीन ही शाखात सरांनी नावलौकिक मिळवला. तीन ही शाखेतील सहकारी बंधू भगिनी यांच्याशी स्नेहाचे सबंध. एखाद्या विषयावरील परखड  व योग्य मत मांडणे  हा त्यांचा स्वभाव सहकारी वृत्ती एखादी समस्या सहजपणे सोडविणे. ग्रुपमध्ये दिलेली जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडणे. कुटुंबामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. बाबर ताईची साथ त्यांना मोलाची ठरली. आजही गावाकडील बंधू आणि बाबर यांच्या कुटुंबात वैचारिक एकी आहे. बंधू वहिणी पुतण्या सूनबाई यांच्या विषयी कधी ही वेगळेपणा नाही हे उभयता नेहमी गावाकडील बंधूच्या कुटुंबाला साथ करतात. मानुसकी आणि मानवता या उभयतांनी जपली आहे. आणि आयुष्यभर केलेल्या प्रामाणिक कष्टाचे फळ त्यांना मुलांच्या रुपाने मिळाले आहे. तीनही मुले उच्च विद्याभुषित आहेत. प्रत्येकाचे अंतरंग हे एक स्वतंत्र जग आहे. त्या प्रमाणे सरांनी आयुष्य भर विद्यार्थ्यांना कुशलतेने मार्गदर्शन केले.विद्या ही लक्ष्मीवंताच्या तराजूत तोलायची चीज नाही. ती प्रज्ञावंताची  दासी असते. हे विद्यार्थ्यां च्या मनावर  अधिक रुजविले.त्यामुळे त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर आहेत. ते नेहमी बाबर सरांच्या मार्गदर्शनाचे स्मरण करतात. 
सेवेतल्या सुखाची गोडी सरांना
समजली. त्यामुळे विद्यार्थी हेच दैवत
मानले. व शिक्षण क्षेत्राची सेवा केली. 
आज गुरुवार दिनांक ३१/१०/२०२४
रोजी सर बत्तीस वर्षे सेवा करुन
सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्ती
नंतर त्यांचे जीवन सुखी समाधानाचे
व आनंदाचे भरभराटीचे आरोग्यमय जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. बाबर सर मी आपणाबध्दल एवढेच म्हणेन 
जग जग माझ्या जीवा, 
असे जगणे मोलाच! 
उच्च गगनासारख, 
धरित्रीच्या तोलाच! 
शुभेच्छुक:-
वारी समूह कराड
                दांडेली    समुह कराड
                 मैत्री कट्टा कराड
शब्दांकन श्री. पोपटराव माणिकराव काटकर. कुकुडवाड. मान सातारा