नवचैतन्य टाईम्स वाई (अमोल मांढरे)-लोकमान्य टिळक ग्रंथालय वाई. आणि महाराष्ट्र साहित्य परिषद वाई शाखा. यांच्या संयुक्त विद्यमाने कवी संमेलन आयोजित केले होते. यावेळी अनेक कवींनी उत्साह पूर्ण सहभाग घेतला होता. पत्रकार व साहित्यिक कविराज अमोल मांढरे. यांनी याप्रसंगी " जीवन हे सुंदर आहे"ही कविता उस्फूर्तपणे सादर केली.
या कवितेतून रसिकांना प्रबोधन व सामाजिक संदेश आणि त्याचबरोबर मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा. हे विषय काव्यतून त्यांनी मांडले. त्यांच्या कवितेला रसिकांचा व सन्माननीय अतिथींचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. कविराज अमोल मांढरे. हे पत्रकार,साहित्यिक असून ते बऱ्याच वर्षापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. वाई येथे कार्यरत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक विविध सामाजिक विषयातून वाचकांसमोर विविध विचार मांडले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 70 ते 80 काव्य संमेलनातून उत्स्फूर्त सहभाग घेऊन अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्याचबरोबर आपल्या सर्व साहित्यिकांच्या योगदानामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा गौरवास्पद व सुंदर दर्जा मिळाला हे मत त्यांनी मांडले आहे. आणि हाच वारसा भविष्यातही कायम ठेवायची जबाबदारी आपल्या सर्वांची हा विचारही त्यांनी व्यक्त केला.समाजातील साहित्यप्रेमी, थोरांचा आशीर्वाद व मित्रपरिवाराच्या साथीने भविष्यातही साहित्य व पत्रकारीता क्षेत्रात उत्स्फूर्तपणे आणि निर्भीडपणे कार्य करणारच.असा ठाम विश्वास कविराज आमोल मांढरे यांनी व्यक्त केला आहे. आपल्या . नवचैतन्य टाइम्स मध्ये ते आपले मत विविध लेखातून आणि काव्यतून मांडत आलेच आहेत. व भविष्यातही ते हे कार्य चालूच ठेवतील. असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
धन्यवाद.
कविराज अमोल मांढरे. वाई. जिल्हा सातारा.
Mobile no.7709246740
