NCT NCT घाटमाथ्यावर पोलिस दलाच्या वतीने संचलन

घाटमाथ्यावर पोलिस दलाच्या वतीने संचलन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- अगदी काही दिवसांवरच येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ पोलिस दलाच्या वतीने तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे,तिसंगी,वाघोली,गर्जेवाडी,कुंडलापुर,जाखापुर व कुची गावांमध्ये पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसदलांने सशस्त्रसह संचलन केले.
         अगदी काही दिवसांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये,शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी व मतदान प्रक्रिया अगदी शांततेत पार पडावी या दृष्टिकोनातूनच हे संचलन पार पडले.