नवचैतन्य टाईम्स वाई (प्रा.संभाजी लावंड)-दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी वाई येथील धनश्री हाॅलमध्ये शिवसेना आणि युवासेनचा संयुक्त मेळाव्याचे प्रभावी आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात सभेच्या अध्यक्षस्थानी श्री.खा.नितीन काका पाटील होते. मान्यवरांंची प्रचंड उपस्थिती हे या कार्यक्रमात विशेष जाणवली. श्री खा. मकरंद आबांना अभूतपूर्व पाठींबा दर्शवण्यासाठीचे नियोजन युवा कार्यकर्ता विधान सभा प्रमुख श्री योगेश फाळके यांनी केले होते.या कार्यक्रमात चारशे ते पाचशे जन लोकांचा समुदाय उपस्थित होता.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनावाई पूर्व तालुक्याचे श्री गणेश पवार यांनी आपल्या प्रभावी भाषेत उपस्थितांचे मनापासून स्वागत करुन कार्यक्रमाचे प्रयोजन कथन केले. श्री योगेश फाळके यांनी आपल्या खास शैलीमध्ये अत्यंत प्रभावी संभाषणामुळे उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. त्या संभाषणात त्यांनी सध्या महायुती असल्याने आबांच्या पाठीमागे या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ते प्रचंड बहुमतांनी विजयी होतील असा आत्मविश्वास व्यक्त केला. या साठी आमचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील व कार्यरत रहाणार आहोत यात कसलीच शंका नाही. तर, श्री संदीप भाऊ शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य सातारा यांनी आबांच्या पंधरा वर्षांच्या विकास कामाचा चांगलाच मागोवा घेऊन कार्य व कर्तृत्वाचा गुणगौरव केला.खा.श्री नितीन पाटील यांनी आपल्या भाषणा मध्ये मागच्या पंचवार्षिक कार्याचा आढावा घेऊन भागातील काही विकास कामे वाई प्रवेश द्वारातील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ भव्य पुतळा उभारण्यात येईल व नवीन कामांची पुर्तता करण्यासाठी आबा तत्पर आहेत. असे निवेदन केले.
या कार्यक्रमात विधानसभा प्रमुख श्री योगेश आनंदराव फाळके, महिला विधान सभा संघटिका सौ. वनिता जाधव महिला जिल्हा समन्वयक सौ. वर्षा आरडे ,महिला तालुका प्रमुख वाई सौ. सुजाता गायकवाड,महिला वाई शहर उपाध्यक्ष सौ.वनिता चव्हाण, पूर्व वाई तालुका प्रमुख श्री गणेश पवार,पश्चिम वाई तालुका प्रमुख श्री तुकाराम तुपे,वाई शहर श्री रणजित गाडेकर,पाचगणी शहर श्री राहुल शिंदे,महाबळेश्वर शहर प्रमुख श्री गौरव राक्षे,वाई तालुका सर्व बुध प्रमुख,शिवदूत शिवसेना,शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष,आदि पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता श्री योगेश फाळके यांनी सर्वांचे आभार मानले.
