NCT NCT तरुणांच्या हाताला काम देण्यासाठीच निवडून द्या- डॉ शंकर माने

तरुणांच्या हाताला काम देण्यासाठीच निवडून द्या- डॉ शंकर माने



नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- आज अखेर कोणत्याही सताधार्यांनी तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात कोणत्याही प्रकारची उद्योग निर्मिती केली नसल्याने आज येथील तरुणांना पुणे,मुंबई सारख्या शहरात स्थलांतर करावे लागत आहे अथवा बेरोजगार होऊन फिरावे लागत आहे हे पाप आजवरच्या सताधार्यांनी केले आहे.केवळ खोटी आश्वासने देऊन तुम्हाला झुलवत ठेवले आहे.यांना कायमचाच धडा शिकविण्याची नामी संधी आज तुमच्या पुढे आली असून.मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मला एक वेळ संधी द्या असे आवाहन बहुजन समाज पार्टीचे उमेदवार डॉ शंकर माने यांनी ढालगाव (ता कवठेमहांकाळ) येथे घेण्यात आलेल्या कोपरा सभेत केले.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना शंकर माने पुढे म्हणाले की समोरील प्रस्तापित आमदार व माजी खासदारांनी तुमचा केवळ मतांसाठी वापर केला असून त्यांचे विकासाचे काहीही देणेघेणे नाही.त्यामुळे त्यांना कायमचेच हद्दपार करा असेही यावेळी ते म्हणाले.जर मला निवडून दिले तर शंभर टक्के रोजगार निर्मिती, अगदी सर्वच रोगांवर मोफत उपचार,रस्ते,पाणी व शेती विषयक प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.यावेळी जालिंदर मोहिते, नागेश खामकर, सुभाष मराठे,सविताताई माने,उज्वला सावंत,संतोष वनखडेसह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.