NCT NCT आर आर आबानीं राबविलेल्या अभियानाची घेतली होती जगाने दखल -आमदार सुमनताई पाटील

आर आर आबानीं राबविलेल्या अभियानाची घेतली होती जगाने दखल -आमदार सुमनताई पाटील


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- तंटामुक्ती व ग्रामस्वच्छता सारख्या आबानीं राबविलेल्या अभियानाची जगाने दखल घेतली होती,पण आज विरोधक म्हणतात स्व आर आर आबांनी पंचवीस वर्षांत काय केले यासारखा विनोद आणखी कोणता असे उदगार आमदार सुमनताई पाटील यांनी घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथे घेण्यात आलेल्या बैठकीत काढले यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
      यावेळी बोलताना श्रीमती सुमनताई पाटील पुढे म्हणाल्या की स्व आबांनी केलेल्या विकासात्मक कामामुळेच आज संपूर्ण मतदारसंघ पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठीशी उभा राहिला आहे यातच सर्व काही आहे.तर यावेळी बोलताना तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय (दादा) पाटील म्हणाले की तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी रोहित पाटील निवडून येणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.तर मतदार संघातील प्रत्येक गावात रोहित पाटील यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे पाहून ते निवडून येण्याची फक्त आता औपचारिकता बाकी राहीली असल्याचे महीला आघाडीच्या योगीता पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
       यावेळी कवठेमहंकाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष संजय पाटील,महीला आघाडीच्या कार्याध्यक्षा नुतन वाघमारे,शहराध्यक्षा मिनाक्षी माने,दिपाली जाधव,उपसरपंच सुनील कांबळे,तंटामुक्तीचे कुलदीप शिंदे,सिध्दनाथ पतसंस्थेचे माजी चेअरमन संजय शिंदे,ग्रामपंचायत सदस्य दिलीप शिंदे, ग्रामपंचायत सदस्या दिव्या शिंदे,पवित्रा शिंदे,लालासाहेब शिंदे,भास्कर शिंदे,सो दिव्या शिंदे,सौपवित्रा शिंदे,सौ मंगल शिंदे,सौ विद्या शिंदे,सौ कांचन शिंदेसह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार सुनील कांबळे यांनी मानले.