नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाह आटोपताच आता सर्वत्रच विवाह सोहळ्याची धामधूम सुरू होत आहे.उपवर मुलामुलींसह स्थळे शोधण्याच्या कार्यक्रमालाही सध्या वेग येत आहे.एकदा का लग्न ठरलं की मग काय लग्नघाई सुरूच होते.पण याच लग्न घाईतच एक गोष्ट मात्र कालबाह्य होताना दिसत आहे ती म्हणजे पारंपरिक लग्न पत्रिका.
जेव्हा केव्हा मानवाने छापाई यंत्राचा शोध लावला अगदी तेव्हा पासूनच लग्न समारंभासाठी लग्न पत्रिका ही अविभाज्य भागच बनली होती.हीच लग्न पत्रिका त्यावेळी पासुन गावकऱ्यांसह गावोगावातील आपल्या मित्र,पै पाहूणे व आप्तेष्टांना घरपोच होत असे.हे काम घरातील लोक करतच पण जोडीला गावातीलच निमंत्रणे देणार्यांकडेही हे काम दिले जात असे. परंतु या कालाच्या ओघात जगण्याचे संदर्भच बदलले आहेत.सध्याच्या या सोशल मीडियाच्या जमान्यात लग्न पत्रिकाच कालबाह्य होत चालली आहे.लग्नपत्रीका वाटण्याची प्रथाच बंद होऊन,आता सोशल मीडियावरूनच निमंत्रणे दिली जाऊ लागली आहेत.त्यासाठी फोन,व्हाॅटसअॅप,मेसेज, फेसबुक यांद्वारे लग्नांची निमंत्रणे दिली जाऊ लागली आहेत.अगदी लोकांनाही या पध्दतीने केंव्हाच आपलंसं केलं आहे.त्यामुळे बहुतांश लोक याच गोष्टीचा अवलंब करू लागले आहेत.
लग्न कर्त्या कुटुंबालाही ही पध्दत अगदी सरळ सोपी वाटत असुन,यामुळे अगदी वेळ व पैसाचीही बचत होत आहे.त्यामुळे सराहास लोक या पध्दतीच अवलंब करत असल्याने,सध्या ही पध्दत अगदी सर्वमान्य होत आहे.त्यामुळे आपसूकच लग्न समारंभातुनच लग्न पत्रिका ही संकल्पनाच कालबाह्य होत चालली आहे.


