नवचैतन्य टाईम्स महाबळेश्वर प्रतिनिधी(शरद झावरे)-महाबळेश्वरमधील हॉटेल, टॅक्सी, गाईड, बोटींग, हॉर्स रायडींग अशा सर्व सेवा ऑनलाईन बूकिंगच्या माध्यमातून एकाच क्लिकवर आणण्यासाठी 'गो महाबळेश्वर.कॉम' ही वेबसाईट विकसीत करण्यात आलेली असून या फर्मच्या ऑफिसचे उद्घाटन महाबळेश्वरचे माजी नगरसेवक कुमार शिंदे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी कुमार शिंदे म्हणाले, महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असून येथे हजारोंच्या संख्येने पर्यटक दरवर्षी भेट देतात. परंतु महाबळेश्वर सारखे पर्यटनास पूरक असणारे ठिकाण म्हणावे तितके प्रकाशझोतात आलेले नसलेने तेथील पर्यटन वाढीसाठी महाबळेश्वर इंडेव्हर प्रा. लि. या कंपनीचे संचालक अभिजीत पाटील, सुमित कांबळे, केतन जाधव, अजिंक्य कांबळे व पूजा मोडक आणि कॉंटॉक्स टेक्नॉलॉजीस् प्रा. लि. कंपनीचे संचालक शुभम यादव, ओंकार पाटील व अनिकेत पाटील यांनी "गो महाबळेश्वर.कॉम" या वेबसाईटची निर्मिती करुन महाबळेश्वरमध्ये पर्यटकांसाठी उपलब्ध असणाऱ्या व गरजेच्या असणाऱ्या सर्व सोई-सुविधा एकाच क्लिकवर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून महाबळेश्वरमधील हॉटेल, टॅक्सी, गाईड, बोटींग, हॉर्स रायडींग, मार्केटमधील दुकाने, अत्यावश्यक सेवा आदी सर्व सेवांसाठी ऑनलाईन बूकींग करता येणार आहे. सर्वच सोई-सुविधा देणारी व महाबळेश्वरला जास्तीतजास्त प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने ही वेबसाईट नकीच काम करेल, अशी आम्हा सर्वांनाच खात्री आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
पंचायत समितीचे मा. सभापती ॲड. संजय जंगम म्हणाले, महाबळेश्वरसाठी केलेला हा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. महाबळेश्वरच्या नावाने वेबसाईट सुरु झाल्यामुळे महाबळेश्वरच्या नावलौकिकात अजून भर पडेल व महाबळेश्वर नक्कीच लोकलवरुन ग्लोबल होण्यास या वेबसाईटचा नक्कीच फायदा होईल.
महाबळेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील म्हणाले, महाबळेश्वर नगरपरिषदेच्या माध्यमातून महाबळेश्वरच्या विकासासाठी कायम आम्ही प्रयत्नशील आहोत. आज 'गो महाबळेश्वर.कॉम' या वेबसाईटच्या माध्यमातून महाबळेश्वरच्या पर्यटनवाढीस चालना मिळेल व जास्तीतजास्त पर्यटकांना सेवा देण्याची संधी आमच्या नगरपालिकेस प्राप्त होईल असा आम्हाला विश्वास आहे.
यावेळी दुय्यम निबंधक मुरली गोडसे, माजी नगरसेवक युसुफ शेख, महाबळेश्वर पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजीत खुरासने, पोलिस उपनिरिक्षक रौफ इनामदार, शिवसेना विभाग प्रमूख हेमंत साळवी, शिवसेना नेते गणेश उतेकर, उद्योजक यतिराज कदम, टाइम्स ऑफ इंडियाचे चिंतामणी लकडे, हॉटेल असोशिएशनचे अध्यक्ष रोहन कोमटी, हॉटेल असोशिएशनचे माजी अध्यक्ष सुर्यकांत जाधव, सॅटर्डे क्लबचे संचालक अजय शिंदे, कोडोलीचे सरपंच आशिष आबा जाधव, नगरपरिषद अधिकारी आबाजी ढोबळे, डॉ. दिलीप पाटील, सदाशिव पाटील, सदानंद जाधव, चरण चव्हाण, अनिकेत मोरे, संग्राम पाटील, आकाश कांबळे, महादेव गुरव, असिफ मुल्ला, प्राचार्य माने सर, राऊत सर, गावडे सर, मोरे सर, निलेश पवार, अझहर बडाने, संतोष भालेराव, शांताराम मोरे, पोलिस कॉंस्टेबल नवनाथ शिंदे, संजय जेधे, उद्योजक विशाल जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
