नवचैतन्य टाईम्स कागल (प्रतिनिधी)- चिमगाव ता. कागल येथील ग्रामपंचायत च्या उपसरपंचपदी कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघाचे अध्यक्ष व मुरगूड चे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील गटाच्या अस्मिता विश्वास चौगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच दीपक आंगज होते तर स्वागत व प्रास्ताविक रवींद्र भाई यांनी केले आहे.
यावेळी प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब आगंज, प्रवीण चौगले, बाजीराव आंगज,नामदेव एकल, रामचंद्र आंगज, दत्तात्रय लोंढे निवृत्ती करडे, शामराव मोरबाळे, नारायण एकल, बाळू पाटील, लक्ष्मण फराकटे, विश्वास चौगले, मारुती कांबळे, नामदेव आंगज विलास चौगले बापू चौगले, दत्ता आंगज व चिमगाव ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते, निवडीनंतर चौगुले समर्थकांनी फटाक्याची आतिष भाजी गुलालाची उधळण करत आनंद उत्सव साजरा केला.
