नवचैतन्य टाईम्स (प्रतिनिधी)-भारत विरूद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅच सुरू व्हायला आता काही तासांचा अवधी शिल्लक राहीले असुन हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्वाचं आहे. कारण जो संघ ही सामना हरेल त्यांच्यासाठी चॅम्पियन ट्रॉफीचा प्रवास संपल्यातच जमा आहे. दरम्यान भारत पहिला सामना जिंकून पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान पहिली मॅच गमावल्यामुळे चौथ्या स्थानावर आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही टीम हा सामना जिंकण्यासाठी जिवाचे रान करत आहेत. पण आता सामन्यामध्ये काय होईल हे तर काळच ठरवेल. पण दुसरीकडे चाहता वर्ग मात्र सोशल मीडियाद्वारे एकमेकांची फिरकी घेताना दिसत आहेत. भारतीय चाहते म्हणताहेत, विजय टीम इंडियाचाच होणार. तर दुसरीकडे पाकिस्तानी फॅन्स सुद्धा पुनरागमनासाठी आपल्या टीमचा उत्साह वाढवत आहेत. तर या पार्श्वभूमीवर भारत विरुध्द पाकिस्तान सामन्यावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
