NCT NCT ॲड. प्रकाश आंबेडकर गुरुवारी कवठेमहंकाळ मध्ये,डॉ शंकर मानेंचा वंचित बहुजन आघाडी पक्ष प्रवेश सोहळा

ॲड. प्रकाश आंबेडकर गुरुवारी कवठेमहंकाळ मध्ये,डॉ शंकर मानेंचा वंचित बहुजन आघाडी पक्ष प्रवेश सोहळा


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-  गुरुवार दिनांक २० रोजी दुपारी एक वाजता ॲड प्रकाश आंबेडकर हे कवठेमहंकाळ दौऱ्यावर येणार असून,त्यांच्या उपस्थित बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष व कामगार नेते डॉ शंकर माने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश करणार आहेत.
गुरुवार दिनांक २० रोजी दुपारी एक वाजता शाहीर राजा पाटील नाट्यगृहात होणाऱ्या कार्यक्रमात डॉ शंकर मानेसह शेकडो कार्यकर्ते यावेळी ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार आहेत.यावेळी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार.यावेळी ॲड प्रकाश आंबेडकर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभणार आहे.