नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी (नौशाद भाई सय्यद)-पाचगणी नगरपरिषदेमध्ये विकास कामे जोरात सुरू असली तरी, नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची औषधीय फवारणी (फॉगिंग) अनेक दिवसांपासून बंद आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत आहे आणि नागरिक आरोग्य धोक्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मच्छरांपासून बचाव करण्यासाठी नियमितपणे फवारणी केली पाहजे परंतु गेल्या काही किती दिवस झाले तरी ही प्रक्रिया पूर्णतः थांबली आहे. यामुळे विविध भागात मच्छरांची संख्या वाढल्याचे स्थानिक लोक नमूद करत आहेत.नागरिकांच्या नुसार, नगरपरिषदेकडून या बाबतीत कोणतीही योग्य कारवाई केली जात नसल्याचे दिसून येते. स्थानिक रहिवाशांनी या समस्येबद्दल नगरपरिषदे लक्ष देत नसल्याने अद्याप कोणतीही कृती झालेली नाही.स्थानिक आरोग्य विभागाकडे या बाबतीत लक्ष वेधण्यात यावे आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता, नगरपरिषदेने लवकरात लवकर औषधीय फवारणी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात लवकरच ही समस्या सोडवने आणि फवारणी सुरू करावी,
नागरिकाचे म्हणतात येत आहे पांचगणी नगर परिषद पांचगणी या सर्व गोष्टींचा विचार करून लवकरात औषध फवारणी करावी
