NCT NCT एक विचार जीवनातील संयमासाठी,एक विचार अंतराळवीर महिला सुनिता विल्यम आणि अंतराळवीर बॅरी विलमोर यांच्यासाठी

एक विचार जीवनातील संयमासाठी,एक विचार अंतराळवीर महिला सुनिता विल्यम आणि अंतराळवीर बॅरी विलमोर यांच्यासाठी


नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(ह.भ.प.प्रा.सौ.            सरस्वती  ताई)
आत्ताच्या पिढीकडे संयम नाही ,
जे काही पाहिजे ते इंन्स्टट ,लगेच दम नाही धीर नाही ,अन्यथा लगेच आत्मविश्वास गमावून आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणार्यांसाठी,
अहो ! मग वाचा आणि दृष्टिकोन बदला,
कारण हे गरजेचे आहे तूमच्या-आमच्या सर्वांसाठी-
सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर अवकाशात फक्त 8 दिवस राहणार होते.
पण त्याऐवजी, ते अंतराळात तब्बल 286 दिवस अडकले होते!
कुठे? अवकाशात अडकले होते.
विचार करा -
तुम्ही एका छोट्या सहलीसाठी पॅकिंग करता, पण जवळजवळ एका वर्षासाठी घरापासून लांब राहता.
ताजी हवा नाही. खरी खुरी घरगुती जेवणं नाही. बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग नाही—फक्त रिकाम्या अवकाशात थांबून राहायचं.आणि कधी (किंवा खरंच) घरी परतता येईल का, याची खात्रीही नाही.आणि आपण पृथ्वी वर आपल्या च देशात,राज्यात, जिल्ह्यात,तालुक्यातील एखाद्या शहारात इथेच असतो आणि10 मिनिटं ट्रॅफिकमध्ये अडकलो तरी चिडचिड करतो.बायकोने बनवलेले जेवण यामध्ये ही शंभर खुसपटे काढतो, घरात ही एकमेकांवर चिडचिड करतो,एकमेकांना उण-दुण बोलतो रागवतो,संयम तुटतो, आणि नाती ही तुटतात, नकारात्मक विचाराची मनात वादळे घोंगावतात,आणि शेवटच्या टोकाचे  निर्णय घेतात,असेल परिस्थिती वाईट नसेल परिस्थिती तूमच्या हातात पण मनस्थिती तर आहे ना तूमच्या हातात तसेच विचार यांनी केले असतील त्यामूळे चिंता न करता चिंतन करून मार्ग निवडणे ही गरज सांगणारे हे उदाहरण खरच खूपच मार्मिक आहे.एका व्यवहाराला काही महिने उशीर झाला तरी संयम सुटू न देणे.एका नकारपत्रामुळे सगळं सोडून द्यावंसं वाटणारे आपण वाचा विचार बदला.
दृष्टीकोन बदला
या अंतराळवीरांकडे पर्यायच नव्हता.
ते तिथून सुटण्यासाठी कोणतीही फ्लाइट बुक करू शकत नव्हते.त्यांना स्थिती स्वीकारून, शांत राहून, आणि संयमाने वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.
286 दिवसांचा अनिश्चिततेचा कालावधी.
... आणि त्यांनी तो यशस्वीपणे पार केला!
जर हे अंतराळवीर 8 दिवसांच्या ट्रिपवर जाऊन 9 महिने अवकाशात टिकू शकतात,तर तुम्ही आणि मी आयुष्यातले काही छोटे अडथळे, विलंब, आणि संघर्ष सहज झेलू शकतो!
या गोष्टीतून काय शिकायला मिळतं?
संयम ठेवा: तुमच्या नियोजनानुसार सगळं घडेलच असं नाही. पण संयम ठेवा, मार्ग सापडेल.
स्थिती स्वीकारा: काही वेळा परिस्थिती आपल्या हातात नसते, पण आपली प्रतिक्रिया आपल्या हातात असते.
तणावाने काहीही सुटणार नाही: शांत राहा आणि पुढे काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करा.
✅  लक्षावर भर द्याः  छोटे विलंब आले तरी अंतिम उद्दिष्ट नजरेसमोर ठेवा.
जिंकायचं ठरवा: परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यातून मार्ग काढायचाच, असं ठरवा.
शेवटी:जीवनात अनेकवेळा तुमच्या योजना कोलमडतील. फसतील ही गोष्टी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेतील ही,पण सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर 286 दिवस अवकाशात टिकले,तर तुम्हीही तुमच्या अडचणींवर मात करू शकता!
!!मनःस्थिती बदला, परिस्थिती बदलेल!! 
धीर ठेवा,आणि पुढे चला. 🚀 
आकाशी झेप घे रे विचारा,
(सौ.सरस्वती ताई भोसले-वाशिवले 
वाई)