नवचैतन्य टाईम्स कराड(ॲड.पंडित गायकवाड)- नागपूर येथे झालेल्या दिव्यांगांच्या राज्यस्तरीय शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धेत डॉ.द.शि. एरम मूकबधिर विद्यालय, रौदापूर, कराडच्या खेळाडूंची गोल्डन भरारी घेतली असुन नागपूर येथे दिव्यांगांच्या राज्यस्तरीय शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्रातून साधारण ३००० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते झाले. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अनेक मंत्री गण, दिव्यांग कल्याण आयुक्त मा. पुरी साहेब, उपायुक्त मा. बाजीराव जाधव, आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेत डॉ.द.शि. एरम मूकबधिर विद्यालयातील खेळाडू कु. जान्हवी हणमंत सावंत (इ.६वी) हिने १३ ते १६ वयोगटात १०० मी. धावणे महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल व लांब उडी मध्ये राज्यात द्वितीय क्रमांक पटकावून सिल्वर मेडल प्राप्त केले. या स्पर्धेसाठी ॲथलेटिक्स कोच श्री.एन.टी. साळुंखे सर तसेच श्री. सस्ते सर, श्रीम. बनसोडे मॅडम यांनी काम पाहिले.
अर्बन कुटुंबप्रमुख मा. सुभाषराव जोशी, कराड अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. सुभाषराव एरम, सीईओ दिलीप गुरव साहेब, सौ. रश्मी एरम वहिनी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. चिन्मय एरम, उपाध्यक्षा सौ. जयश्री गुरव वहीनी, संचालिका सौ. रोहीणी एरम, मुख्याध्यापक श्री. घाडगे सर, सर्व कर्मचारीवृंद यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
