नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजू शेख)- आटपाडी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की आपण सर्वांनी आपले फार्मर आयडी आजच आपल्या जवळच्या सेतू केंद्रात महा-ई-सेवा केंद्रात आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन त्वरित काढून घ्यावेत जेणेकरून आपल्याला पीएम किसान पिक विमा तसेच सर्व जमिनी संबंधित असणाऱ्या योजनांचा लाभ मिळेल.रेशन मिळणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी आजच आपली इ केवायसी जवळच्या रेशन धान्य दुकानात जाऊन पूर्ण करून घ्यावे अन्यथा आपल्याला धान्य मिळण्यास अडचण येईल.
मांग गारुडी नंदीवाले रामोशी वडार या तसेच अन्य जातीच्या लोकांनी आपल्या जातीचे दाखले काढण्यासाठी त्वरित आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र आपले सरकार केंद्रामध्ये संपर्क करावा आपल्याला एका दिवसात दाखले दिले जातील. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सातबारावर आपण स्वतःच ई पीक पाहणी नोंद करून घ्यावी.यामुळे आपल्याला वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ मिळेल
