NCT NCT प्रा. संभाजी लावंड.यांना राज्यस्तरीय साहित्य प्रेरणा पुरस्कार जाहीर

प्रा. संभाजी लावंड.यांना राज्यस्तरीय साहित्य प्रेरणा पुरस्कार जाहीर


नवचैतन्य टाईम्स वाई (प्रतिनिधी)-खातगुण ता. खटाव येथील ग्रामीण साहित्यिक प्रा.श्री संभाजी लावंड यांच्या गुराखी या ग्रामीण कथासंग्रहाची राज्यस्तरीय पलपब साहित्य प्रेरणा पुरस्कारासाठी निवड झाली आहे.पलपब साहित्य प्रकाशन,अहमदाबाद गुजरात या प्रख्यात संस्थेतर्फे साहित्य संमेलन भरणार आहे.साहित्यिकांचा पुरस्कार व सन्मान सोहळा,तसेच राज्यस्तरीय कवी संमेलन,हे दिनांक ११मे रोजी सातारा येथे संपन्न होणार आहे. यावेळी राज्यस्तरीय कवी संमेलनात वाई सातारा,पुणे,सांगली,कराड, कोल्हापूर,सोलापूर फलटण नागपूर, अहिल्यानगर या व इतर कवींची उपस्थिती असणार आहे.याच संथेमार्फत श्री संभाजी लावंड यांच्या "वलाफोक" या दुसऱ्या ग्रामीण कथा संग्रहाचा मान्यवरांच्या हस्ते  प्रकाशन सोहळा होणार आहे. गुराखी या कथासंग्रहाला आठवे मराठी साहित्य संमेलन भरलेल्या ता. कोरेगाव येथे राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने,वाई येथील सर्वांगी प्रतिष्ठान संस्थेने कृष्णेच्या घाटावर साहित्य रत्न हा पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला आहे. हे साहित्यातील मिळालेले सर्व पुरस्कार त्यांनी खातगुण या आपल्या निसर्ग रंम्य जन्म भूमिला,पवित्र मातीला, अत्यंत स्नेहपुर्वक सद्भावनेतून समर्पित केले आहेत अशी भावना त्यांनी लोकप्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली आहे.