नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- कवठेमहंकाळ तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीचे सन २०२५ ते २०३० कालावधीकरीताच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत हे बुधवार दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती सभागृहात होणार असून, यावेळी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार अर्चना कापसे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की तालुक्यातील एकूण ५९ ग्रामपंचायती असुन,या ग्रामपंचायतीचे सन २०२५-२०३० या कालावधीसाठीचे सरपंचपदाकरीता प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करणेकरीता कार्यक्रम सध्या प्राप्त झालेला आहे.सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याचा कार्यक्रम उपजिल्हाधिकारी वसुंधरा बारवे यांचे अध्यक्षतेखाली २३ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती सभागृहात होणार आहे तरी ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहनही तहसीलदार अर्चना कापसे यांनी यावेळी केले.
