NCT NCT बसवराज पाटील यांची जनसुराज्य पक्षाच्या जत तालुका अध्यक्षपदी निवड यावेळी अनेक कार्यकर्त्यांचा जनसुराज्य पक्षात प्रवेश

बसवराज पाटील यांची जनसुराज्य पक्षाच्या जत तालुका अध्यक्षपदी निवड यावेळी अनेक कार्यकर्त्यांचा जनसुराज्य पक्षात प्रवेश


नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी)- जनसुराज्य पक्षाच्या जत तालुका अध्यक्षपदी बसवराज पाटील (एकुंडीकर) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. बसवराज पाटील हे एकुंडी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषद जत तालुका अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कार्य केले आहेत, त्यांना गावगाड्याची सखोल जाण आणि राजकीय तसेच सामाजिक कार्याचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील जनसामान्यांचा आवाज बुलंद होईल, असा विश्वास पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री, आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जत तालुक्यातील विविध गावांतील अनेक नवयुवक व कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पक्षात जाहीर प्रवेश केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी झटण्याचा संकल्प व्यक्त केला.
या प्रसंगी बोलताना नुतन तालुका अध्यक्ष बसवराज पाटील म्हणाले,
"संस्कार! संकल्प!! सिध्दी!! या ब्रीदवाक्यानुसार आम्ही तालुक्यातील शेवटच्या माणसाच्या न्यायासाठी लढा उभारणार आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आहोत आणि जनसुराज्य पक्षाचा झेंडा तालुक्याच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात फडकावणार आहोत," असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला जिल्हातील पक्षाचे अनेक पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रभावीपणे पार पडले.