NCT NCT शहरांसह आता ग्रामीण भागातही किरकोळ विक्रेत्यांकडेही स्मार्ट पेमेंटची सुविधा,सुट्या पैशांच्या जाचातून होतीया ग्राहकांची सुटका

शहरांसह आता ग्रामीण भागातही किरकोळ विक्रेत्यांकडेही स्मार्ट पेमेंटची सुविधा,सुट्या पैशांच्या जाचातून होतीया ग्राहकांची सुटका

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- सर्वत्र डिजिटल पेमेंट इको सिस्टिममुळे आपल्या दैनंदिन जगण्यातील व्यवहाराची पद्धतच बदलली आहे.आता शहराप्रमाणेच कवठेमहंकाळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील चहा,किराणा दुकान,भाजीपाला,भंगारवाला, चायनीज कॉर्नर,इतर व्यवसाय किंवा मोठ्या शोरूम मध्येही 'युपीआय'द्वारे ऑनलाइन व्यवहार होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या डिजिटल इंडियात शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही स्मार्ट पेमेंटला प्राधान्य दिले जात आहे.तर किरकोळ व्यावसायिकांची व ग्राहकांची सुट्या पैशाच्या कटकटीतून अगदी सुटका होत आहे.
व्यवहारातील एक रुपयांपासून हजारो रुपयांचे व्यवहार हे आता स्मार्ट पेमेंटद्वारे कॅशलेस केले जात आहेत.त्यामुळे घरात किंवा बाजारात प्रत्येक ठिकाणी ऑनलाइन व्यवहारालाच प्राधान्य दिले जात आहे.डिजिटल इंडियात शहराबरोबर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सुविधांना प्राधान्य दिले जात आहे.शहरातील मोठमोठ्या शोरूमबरोबर पाणीपुरीसह इतर किरकोळ व्यावसायिकांकडे सुद्धा डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.आता तर,ग्रामीण भागातही ऑनलाईन व्यवहार करण्याला प्राधान्य दिले जात आहे.त्यामुळे खिशात रक्कम असो अथवा नसो,व्यवहार मात्र वेळेत पूर्ण होत असल्याचे चित्र अगदी सर्वत्रच दिसून येत आहे.त्यामुळे रोख रक्कम ठेवणे नागरिक टाळत असल्याचे दिसून येत आहे.
शहरासह ग्रामीण परिसरात आता या ऑनलाईन व्यवहारामुळे सुट्या पैशांचे टेन्शन मिटले आहे.छोट्या विक्रेत्यांकडेही स्मार्ट पेमेंटची सुविधा उपलब्ध झाली आहे.ग्रामीण भागात तर आता आधारकार्डवरून बँकेतील पैसे काढून दिले जातात.त्याचबरोबर घरातही मोबाइलच्या सुविधेद्वारे  वीज मीटरचे बिल,टेलिफोन बिल,ट्रॅव्हल कंपन्यांचे, विमानाचे, रेल्वेचे तिकीट,सिलिंडरची रक्कमदेखील ऑनलाइन व्यवहारांद्वारे स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.त्याचबरोबर ग्रामीण परिसरातील चहा,भेळ सेंटर,किराणा दुकान, भाजीपाला,भंगारवाला, चायनीज कॉर्नर इतर व्यवसायांसाठी ऑनलाईन सुविधेचा वापर वाढला आहे.परिणामी,सुट्या पैशांचे टेन्शन मिटले आहे.
सध्या या ऑनलाईनमुळे खरेदी विक्रीही वाढली असून या व्यवहारातद्वारे कॅशलेस व्यवहार केला जात आहे.ऑनलाईनद्वारे एखादी वस्तु प्राप्त झाल्यानंतर त्याचे पेमेंटही ऑनलाइनच अदा केले जात आहे.त्यामुळे व्यवहार अथवा व्यापाराच्या कक्षाही वाढत आहेत.
फोटो :- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील मध्यवर्ती असणाऱ्या सुजल किराणा स्टोअर्स मध्ये मोठ्या प्रमाणात कॅशलेस,ऑनलाईन प्रणालीचाच वापर होतानाचे दिसून येत आहे.