घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील प्रतिष्ठित नागरिक व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे सेवा निवृत्त अधिकार रघुनाथ बापूसो उर्फ आर बी शिंदे (वय-७२) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.ते सर्वत्र आरबी साहेब म्हणुन प्रसिद्ध होते.त्याचबरोबर ते जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे सेवा निवृत्त अधिकारी होते.निवृती नंतर ते कवठेमहंकाळ येथे स्थायिक झाले होते.त्यानंतरही ते घाटनांद्रे (कवठेमहंकाळ ) येथील सर्व सेवा शिक्षण मंडळाचे अद्याप पर्यंत चेअरमन होते.त्यांनी निवडक ज्ञानेश्वरीतील श्लोकाचे लिखाण करुन त्याचे प्रकाशनही केले होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,तीन मुली,सुन,जावाई,नातवंडे असा परिवार असुन रक्षाविसर्जन मंगळवार दिनांक २० रोजी सकाळी आठ वाजता कवठेमहंकाळ येथील स्मशानभूमीत घेण्यात आले आहे.
घाटनांद्रे येथील प्रतिष्ठित नागरिक जि.म.बँकेचे निवृत्त अधिकारी रघुनाथ शिंदे यांचे दुःखद निधन
May 19, 2025
