NCT NCT सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाळेखिंडी येथे वृक्षारोपण संपन्न

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाळेखिंडी येथे वृक्षारोपण संपन्न

नवचैतन्य टाईम्स माडग्याळ वार्ताहर (विजय चौगुले)-सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पालक मंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मा.ना. चंद्रकांत दादा पाटील साहेब  यांच्या वाढदिवसानिमित्त वाळेखिंडी येथे लोकनियुक्त सरपंच वसुधाताई हिंगमिरे व अपूर्वा फाऊंडेशन यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले .                                                                   सरपंच वसुधाताई हिंगमिरे म्हणाले की,  आज जागतिक तापमान वाढीचे परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागत आहे,पर्यावरण वाचले तरच पृथ्वीचा समतोल राहील यासाठी प्रत्येकाने थोडातरी पर्यावरनाचा विचार करणे गरजेचे आहे.  वाढदिवस म्हटले की,  इव्हेंटच होतो,अनेक प्रकाराने तो साजरा केला जातो.पण वृक्षारोपण, ,गोर-गरीबांना मदत,अनाथाश्रम,वृध्दाश्रम यांना मदत असे  सामाजिक उपक्रम केले,तर समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण होतो . दरवर्षी एकतरी झाड लावावे ,इतकेच नाही तर त्याला वर्षभर पाणी मिळेल याचीही व्यवस्था केली आहे. वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे .पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे. एक वृक्ष लावुन जन्मदिवस साजरा करुया वृक्ष मोठा होई पर्यंत त्या वृक्षाचे संगोपन करुया तरच आपल जिवन अमुल्य प्रदुषण मुक्त होईल व शुध्द हवा मिळु शकेल. आक्सीजन मोठ्या प्रमाणात मिळेल. वृक्षारोपण वृक्षसंवर्धन "एक वृक्ष आरोग्य स्वस्थ" चला आज पासून संकल्प करुया एक वृक्ष लावुन  पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करुया असे प्रतिपादन वाळेखिंडी चे लोकनियुक्त सरपंच वसुधाताई हिंगमिरे  यांनी केले.यावेळी वाळेखिंडीचे लोकनियुक्त सरपंच वसुधाताई हिंगमिरे , महादेव हिंगमिरे, व अपूर्वा फाऊंडेशन ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.