NCT NCT रखडलेले रस्त्याचं काम पूर्ण व्हावं या मागणीसाठी शेंडगेवाडी ग्रामस्थांचं तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

रखडलेले रस्त्याचं काम पूर्ण व्हावं या मागणीसाठी शेंडगेवाडी ग्रामस्थांचं तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी (राजू शेख)-मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बनपुरी ते शेंडगेवाडी असा रस्ता मंजूर आहे मागील तीन वर्षापासून हा रस्ता तीन ते साडेतीन किलोमीटर काम झालेला आहे मात्र जवळपास एक किलोमीटर रस्ता हा वादामध्ये बंद पडलेला आहे सदरचा रस्ता व्हावा या मागणीसाठी शेंडगेवाडी ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाकडून अद्याप रस्ता करण्यात आलेला नाही म्हणून सोमवार 23 जून पासून ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केला आहे. 
सदर गावाची जवळपास साडेचारशे इतकी लोकसंख्या आहे या गावाला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे मात्र हा रस्ता मध्येच अडवलेला असल्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे स्वातंत्र्यापासून आजतागायत या गावाला पक्का रस्ता झालेला नाही परंतु सध्या मुख्यमंत्री सडक योजनेतून या रस्त्याला भरघोस निधी मंजूर आहे परंतु स्थानिक आडपाट्यामुळे हा रस्ता रखडल्याने नागरिक त्रस्त आहेत शासनाने कठोर भूमिका घेऊन रस्ता पूर्ण करावा हीच मागणी संपूर्ण ग्रामस्थांची आहे.