NCT NCT नांगोळ्याचे मैदान रमेश खोत यांच्या सुलतान व राम्या बैलजोडी देवा भाऊ केसरीचे मानकरी मैदान पाहण्यासाठी लाखो शौकिनांची उपस्थिती

नांगोळ्याचे मैदान रमेश खोत यांच्या सुलतान व राम्या बैलजोडी देवा भाऊ केसरीचे मानकरी मैदान पाहण्यासाठी लाखो शौकिनांची उपस्थिती

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी (रामचंद्र कोरे-माळी)-नांगोळे (ता. कवठेमंहाकाळ) येथे राजमाता बैलगाडी शर्यत संघ महाराष्ट्र राज्य आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री मा. देवा भाऊ यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त "देवा भाऊ केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचे" आयोजन युवा नेते मा. संदीपजी गिड्डे यांच्या वतीने करण्यात आले होते.                                          या भव्य बैलगाडी शर्यतीच्या उद्घाटन समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार श्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार मा.श्री.गोपीचंद पडळकर साहेबांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले.                            याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष मा. सम्राट महाडिक, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. समित कदम, मा. मिलिंद कोरे, तालुकाध्यक्ष उदय भोसले , ईश्वर वनखडे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बैलगाडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.