NCT NCT पवनचक्की सुरक्षा रक्षकांच्या मागण्याचे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवेदन

पवनचक्की सुरक्षा रक्षकांच्या मागण्याचे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवेदन

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी (रामचंद्र कोरे-माळी):-कवठेमहांकाळ तालुक्यातील तसेच आसपास च्या भागातील सुझलॉन कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पासाठी गेली 18 वर्षापासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या कामगारांना  किमान वेतन , प्रमाणे पगार मिळत नाही, इ पी एफ पूर्ण भरला जात नाही इ एस आय सुविधा मिळत नाही, कामाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपचाराच्या साधन सामुग्री नाहीत सुरक्षा रक्षकांना ड्रेस नाहीत व इतर शासकीय नियमानुसार कोणत्याही सुविधा मिळत नाहीत.. महाराष्ट्र शासन स्थापित सुरक्षा रक्षक मंडळ यांनी जाहीर केलेल्या वेतन दराच्या  निम्मा पण पगार मिळत नाही..  नियमानुसार पगार, व  हक्काच्या सुविधा मागितल्यास कामावरून कमी करण्यात येईल असे कंत्राटदार यांच्या कडून सांगण्यात येत असल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगितले.. मागच्या आठवड्यात तिसंगी ता. कवठे महांकाळ येथे सुरक्षा रक्षकांच्या मागण्या बावत मेळावा आयोजित करण्यात आला होता.. त्या मेळाव्यात ठरल्या प्रमाणे आज शेतकरी कामगार पक्षाचे राज्य नेते भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज कवठेमहांकाळ चे नायब तहसीलदार संजय पवार यांना देण्यात आले..निवेदनातसंबंधित सुझलॉन कंपनीशी तातडीने पत्रव्यवहार करून संबंधित सुरक्षा रक्षकांच्या मागण्या बाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात आली आहे..18 वर्षापासून सुरू असलेल्या शोषणा विरोधात तीव्र लढा उभारणार असल्याचे भाई दिगंबर कांबळे यांनी सांगितले. या लढ्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन संभाजी ब्रिगेडचे युवा नेते ऋतुराज पवार यांनी दिले.                                 संबंधित कंपनीशी तसेच सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याशी तातडीने पत्र व्यवहार करून आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांच्या मागण्या बाबत पाठपुरावा करू असे नायब तहसीलदार संजय पवार यांनी सांगितले यावेळी सुशांत केंगार, अशोक सोरटे, दीपक पवार, युवराज पाटील, उदय पाटील, शकील मुलाणी, हणमंत पाटील, प्रताप शिंदे,दत्तात्रय वठारे, जनार्दन केंगार व इतर सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.