NCT NCT आखाडी काव्य संमेलनात कवितांच्या सरी बरसल्या

आखाडी काव्य संमेलनात कवितांच्या सरी बरसल्या

नवचैतन्य टाईम्स वाई (प्रा. संभाजी लावंड):-दिनांक २२/७/२०२५रोजी वार मंगळवार या दिवशी सायंकाळी,सनफार्म अग्रो टुरिझम पसरणी या निसर्गरम्य वास्तूमध्ये,महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद शाखा वाई यांनी आखाडी काव्य संमेलन आयोजित केले होते.सदर कविसंमेलनात अध्यक्ष स्थानी प्रसिद्ध युवा साहित्यिक श्री निलेश महिगावकर उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.प्रतापराव देशमुख व नितीन भाई भिलारे हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व लाभले होते. एकूण पंचवीस कवी सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या आरंभीच पावसाने उपस्थिती दाखवली. तरीही सर्वजण एकत्र गोळा झाले.बैठक व्यवस्था अतिशय सुंदर करण्यात आली होती.स्पिकरअद्यावत होता ,मंगळवार असल्याने उशीराने लाईट आली, आणि कवी संमेलनात कविता, गझल या सादरीकरणामुळे उत्तरोत्तर रंगत गेले.सदर कवितांमधून,आषाढी पाऊस, गरमा गरम चहा ते मदिरेच्या रसपाना बरोबर पाऊस, पिक पाणी, नदी, नाले, ओढे, शिवार,पर्वत  दऱ्या, धुके मेघ, सप्तर्षी, सामाजिक धार्मिक,     राजकीय, वैचारिक तशाच चिंतनपर, कवितेबरोबर    प्रेमाविष्कारांचे अनेक आविष्कार ऐकावयास  मिळाले. श्री. दिपक चिकणे यांनी संमेलनात पाऊस ही पहिली गेय कविता सादर करुन, पावसाची विविध बालीश रुपे वर्णन केली.श्री पिसाळ वापू यांनी माझा कोंबडा, नारळ व मदिरेचे महात्म्य वर्णन करुन  संमेलन हसवत ठेवले.श्री प्रताप महागडे यांनी निष्ठावंत आमदार व विषामृत या दोन कवितेतून राजकीय विषय,समाजाचे पतन व सामान्य नागरिकाचे हाल मांडून सर्वांना अंतर्मुख केले.सुजाता घोरपडे यांनी आई नावाच्या कवितेतून आई विषयी कृतज्ञता  व्यक्त करतांना उपस्थितांना भाऊक बनविले.तर वसंत देशमाने यांनी दोन गझला साद करुन तीच कधी चुकतं नसतं या गझ लेला जबरदस्त टाळ्या मिळवल्या. पण त्या गझला समाजापर्यंत गेल्या नसल्याची खंत श्रोत्यांना लागून राहिली.वाईतील श्री ढवण यांनी सुगंधी केवडा कविता सादर करुन सुगंध पसरवत ऐटबाज नावाची हिंदी कविता सादर करुन कवी संमेलनात रंगत आणली ‌.श्री ज्ञानेश सूर्यवंशी यांनी समाज विसंगतीवर गझल सादर केली.क्रांती पाटील यांनी कडक चहा कविता सादर करुन संमेलन गोड व मधूर केले.श्री अजित क्षीरसागर यांनी पाऊस ग्लास सखी या घटकांवर कविता सादर करुन मोगऱ्याच्या सात कळ्या ही अभिनव कविता सादर केली.श्री गणेश गरड यांनी आई मला मूल व्हायचाय ही भावनात्मक कविता सादर करुन भाव जागृती निर्माण केली.श्री गणेश खरात यांनी माणसासारखे कर्म करा.या कवितेतूनप्राणी सुध्दा मानवी वर्तनावर निराश आहेत.असा भाव व्यक्त करुन सर्वांनाअचंबित केले.श्री संभाजी लावंड यांनी बाई खेळण्यात रंग,आणि जी बघावं ती न्यारं या दोन कविता सादर केल्या.विजय मुळीक यांनी नशीब कविता सादर केली तर कवितेचे अध्यक्ष श्री निलेश महीगा वकर यांनी अर्थ नावाची कविता सादर करुन जीवनाचा अर्थ स्पष्ट केला.तसेच श्री संतोष गेडाम, मीना कुलकर्णी,व विशाल कानडे यांनी कविता सादर करुन उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. आपल्या अध्यक्षीय संभाषणातून महिगावकरांनी वाचन संस्कृतीचा जयजयकार करुन सर्व कवितांचा यथार्थ मागोवा घेऊन उत्कृष्ट मार्गद र्शन केले.प्रमुख पाहुणे श्री देशमुख यांनी समग्र लेखक व कवी यांना आशीर्वाद देऊन असे संमेलन वामन पंडित यांच्या समाधीस्थळी व्हावे असे भाकीत केले.तर क्षीरसागर यांनी सर्वांचे यथोचित आभार मानले.