NCT NCT माझा तालुका माझी माणसं गुराखी,वलाफोकचे लेखक संभाजी लावंड

माझा तालुका माझी माणसं गुराखी,वलाफोकचे लेखक संभाजी लावंड

नवचैतन्य टाईम्स वाई :-खटाव तालुक्यातील खातगुण हे गाव तसं निसर्गाने शोभिवंत गाव आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत येणारा राम ओढा, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत येणारी येरळामाई या दोहोंचा संगम होत आहे, अशाच निसर्गाच्या सानिध्यात, काळजासारख्या  जमिनी, या दौलतीने  खातगुण हे गाव वसलेले आहे. शिवाय पीर साहेब या धार्मिक अंगाने हिंदू मुस्लिम मानवतेचा सलोखा जोपासणारे खातगुण  गावचा उरूस तसा प्रसिद्ध आहे, याच खात गुण गावात  शेतकरी गरीब कुटुंबात श्रीयुत संभाजी लावंड यांचा जन्म झाला, लहानपणापासून आई-वडिलांची संस्कार शिदोरी लाभलेले लावंड  सर यांना शिक्षणाची मुळातच ओढ होती, यामुळे त्यांचे शालेय व माध्यमिक शिक्षण  खात गुण व पुसेगाव या पंचक्रोशीत झाले. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाऊन, शेतकरी कुटुंबातील असलेली गरिबी उराशी बाळगून संभाजी लावंड  हा मुलगा उच्च शिक्षित झाला, वाई सारख्या ठिकाणी शिक्षक म्हणून त्यांची सेवा ही बहुचर्चित आहे, विद्यार्थ्याविषयी असलेले ओढ, तळमळ यामुळे लावंड  सर  विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून वाई सारख्या तालुक्याच्या ठिकाणी त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे.                              लहानपणापासून व शालेय जीवनात ग्रामीण संस्कृतीचा व शब्दांचा त्यांच्या मनात व लेखणीत ओलावा कायम आहे. आज खातगुणचा  परिसर नदी ओढा तेथील निसर्ग चित्र ग्रामीण बोलीभाषा व शब्दांचे जुने साम्राज्य, खेडवळ पण रुचकर शब्द, जुन्या शब्दांचा भडिमार, टोपलं भरून दुरडी भरून देण्यात लेखक वाचकांना  विसरत नाही, वाचकांना कसं गुंतवून ठेवायचं ही संभाजी लावंड यांच्या लेखणीत मोठं सामर्थ्य आहे, लेखन करत असताना आपल्या नोकरीला व कुटुंबाला त्यांनी न्याय दिलेला आहे, विद्यार्थी हेच माझं सामर्थ्य आहे, आणि नोकरी ही माझ्या कुटुंबाची शिदोरी आहे, हे सर्व गुण न विसरता निसर्गासौंदर्यात, वाड्या वस्तीमध्ये, दगडा मातीच्या घरामध्ये, शालेय शिक्षणाच्या परिसरात  त्यांच्या आठवणी आजही ते जागृत करून आपल्या उर्वरित जीवनाचा जीवनानंद घेत आहेत, कथा कविता  वाचकांना देत आहेत, हे त्यांचं लेखन दातृत्व मनाला भावणार आहे.                                                            गुराखी, वलाफोक इत्यादी साहित्य कलाकृती करत असताना त्यांना मिळालेल्या ओला फोकचा प्रसाद वडीला कडून लहानपणीच मिळाला. यामुळे या ओल्या फोक मधूनच लेखनाला टोकदार पेन मिळाला, आणि संभाजी लावंड नावाचा लेखक नावारूपाला आला. ही ओला फोकची खरी ओळख आहे, माणूस कसा घडला जातो याचा हे उत्तम उदाहरण आहे.                                                                       श्रीयुत संभाजी लावंड या लेखकाचे स्वभाव गुण मनमिळाऊ आहेत, माणुसकीला जवळीता साधणारे आहेत , शब्दांचे तुषार सिंचन करताना वाचकांचे मन नकळत ते भिजवून जातात. हळवे पण कर्तव्यदक्ष  शिक्षक ही खरी त्यांची ओळख आहे. आपल्या जगण्याच्या दुःख ला पांघरून घालून लोकांना हसतमुख व करमुनकीत  गुंग ठेवणारा माणूस हा कधीकधी वाचकांच्या पापण्यांच्या कडा ओल्या करतो, कविता सादरीकरणामध्ये असणारी त्यांची एक विशिष्ट शैली प्रेक्षकांना खेळवून ठेवती व लक्षवेधी करते. लहानपणापासून आतापर्यंत आपल्या जीवनात ज्यांनी ज्यांनी आपल्या वरती संस्कार केलेत. त्यामुळे आपल्या जीवनाची जडणघडण झाली आहे, यामुळेच आपल्या जीवनाचे रंग आणि अंतरंग उजळून दिसतात हे मात्र खरे.आपल्या साहित्य कुलाकृतीला आणखी बळ मिळो, नवीन साहित्य संपदा वाचकांना मिळत राहो, या सदिच्छा व्यक्त करून आपल्याविषयी आदर भाव कायमच आहे,. आपले लेखन कविता वाचन व कवितांचे गायन, व सादरीकरण  बहरत  जावे यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🙏
            डॉक्टर जयवंत अवघडे सर