NCT NCT माझा तालुका माझी माणसं

माझा तालुका माझी माणसं

नवचैतन्य टाईम्स वाई (प्रा. संभाजी लावंड):-खटाव तालुक्यातील कातर खटाव हे छोटसं खेडेगाव, याच खेडेगावात श्रीयुत पंडित सर यांचा जन्म झाला, लहानपणापासून शिक्षणाची आवड होती, मुळातच शिक्षणाची आवड असल्यामुळे  भविष्यात शिक्षक होईल, असे त्यांच्या कपाळी असावे,गावात असणारी त्यांची सातवीपर्यंतची शाळा आजही त्यांच्या आठवणीत घर करून आहे, शाळेविषयीच्या आठवणी अगदी आवडीने व कमालीने ते सांगत असतात, इमारतीत फक्त पाचवी  ते सातवी पर्यंतच वर्ग भरत होते, पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग देवळात व झाडाखाली भरायचे. या त्यांच्या आठवणी, शिक्षणाविषयीची ओढ, आणि गावातील श्री  कात्रेश्वर हायस्कूल  पाटलाच्या वाड्यात भरत असे. हे त्यांचे शालेय जीवन, गाव खेड्यातील संस्कृती त्यांच्या बालमनावर खोलवर संस्कार करून गेली, या त्यांच्या शिक्षणाविषयी आवडीनुसार, व आपल्या शालेय जीवनातील संघर्ष, व पुढे उच्च शिक्षण घेऊन, श्री पंडित सर बीएससी बीएड झाले, पण त्यांचा शिक्षण प्रवास अतिशय खडतर होता. बीड पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे फी चे पैसे नव्हते, वेळप्रसंगी पंडित सरांनी  मिळेल ते काम केले. त्यामध्ये मंडप स्पीकर चे काम केले, रेशनिंग दुकानात काम केले, दहावीच्या मुलांची गणित या विषयाची शिकवणी घेतली. वायरमेन चे काम केले, अशा या प्रसंगला तोंड देणारा कातरखटा वचा जिद्दी,धडपडी व शिक्षणाची आस असलेला  मुलगा  सर्व प्रसंगांना सामोरे जाऊन बीएससी बीएड झाला, शिक्षक म्हणून श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या, जाखन  गाव व पुसेगाव हायस्कूलच्या सेवेत राहून 35 वर्षाची प्रदीर्घ सेवा पूर्ण केली,                                                              श्री पंडित सर यांनी संत तुकारामांच्या अभंग गाथेतील काही अभंग त्यांनी छान विस्तृतपणे  आपल्या भेटलेली माणसं या पुस्तकात लेखन केले आहे, पसायदान विषयी अर्थपूर्ण मांडणी केली आहे.आपली शिक्षकी सेवा करत असताना, शिस्त विद्यार्थ्याविषयी आपुलकी, विद्यार्थ्याला शिकवण्याची तळमळ, विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान मिळणे, व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणे, हा पंडित सरांचा शिस्ती बरोबरच स्थायीभाव आहे,                               आपल्या कुटुंबाविषयी असलेला जिव्हाळा, आपल्या मुलांनी शिक्षण चांगले घेऊन उच्चशिक्षित व्हावे ही त्यांची असलेले आंतरिक ओढ मनाला खूप भावून जाते.  हायस्कूलच्या शिक्षकी पेशा च्या सेवेत  असताना, आपल्या विद्यार्थ्यां विषयी असलेला जिव्हाळा, आपल्या सहकार्याविषयी असलेले प्रेमभावना, सामाजिक भान, या सर्व विविध गोष्टी, श्री एस एन पंडित सर यांच्या स्वभावात दिसून येतात, हा कातर खटाव चा  मुलगा आपल्या गावाबरोबरच, पुसेगाव पंचक्रोशी त नावारूपाला येतो, आणि आपल्या गावाबरोबर तालुक्याचे नाव रोशन करतो, हे विशेष गुण दिसून येतात,                                                   एका छोट्या खेड्यातील एक मुलगा परिस्थितीला सामोरे जाऊन, जीवन संघर्ष आत्मसात करून, एक गुणवंतआदर्श शिक्षक म्हणून आपल्या सेवानिवृत्तीनंतरही आनंददायी, कुटुंब वसल्ल्य, समाज ओढ व समाज या विषयाची आत्मीयता, जपून आपले उर्वरित जीवन समृद्ध करीत आहेत हे अत्यंत मोलाचे आहे,आदरणीय श्री एस एन पंडित सर आपल्या कार्यकर्तृत्वाचा आम्ही शब्दांनी गुणगौरव करीत आहोत...आपणावर आपल्या आई-वडिलांनी केलेली संस्कार शिदोरी, गाव व गावातील माणसांनी दिलेले प्रोत्साहन हे ही मोलाचे आहे.💐💐🙏🙏

         लेखक:- डॉक्टर जयवंत अवघडे