NCT NCT कवठेमहंकाळ येथे नामदेव गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची यशस्वी सांगता

कवठेमहंकाळ येथे नामदेव गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची यशस्वी सांगता

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर (जालिंदर शिंदे) :- कवठेमहंकाळ येथील श्री नामदेव महाराज मंदिरात श्री संतशिरोमणी नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवनी समाधी सोहळा व नामदेव गाथा सोहळ्याच्या रोप्यमहोत्सवा निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता मोठ्या उत्साहात करण्यात आली. यानिमीताने विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सलग सात दिवस चाललेल्या या सोहळ्या निमित्ताने दररोज काकड आरती, हरिपाठ, भजन  ,कीर्तन, विविध महाराजांची प्रवचने व किर्तने,ग्रंथ दिंडी, दिपोत्सव, नामदेव गाथा वाचन यांसारख्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर पारायणा दरम्याने हभप विष्णू वायचळ-नांदणी, हभप सुरेश नाझरे-आमणापुर,हभप श्रीकृष्ण गोंदकर -इचलकरंजी, हभप उदय पोरे- मिरज,हभप किशन काशीद- मोरगाव यांची प्रवचने.तर हभप अनंत कणीरे- नांदणी ,हभप अमोल ऐतवडे -मिरज,हभप पंढरीनाथ गोंदकर- इचलकरंजी, हभप गजानन पाटील-शिरोळ,हभप हरिदास बोराटे-आजरेकर,हभप आण्णाप्पा मिरजकर-अथणी यांची बहारदार अशी किर्तन पार पडली.यावेळी व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प ज्ञानेश्वर गुजर-कवठेमंहकाळ  व ह.भ.प विष्णू वायचळ-नांदणी यांनी काम पाहिले.                        सोहळ्या निमीताने शहराच्या प्रमुख मार्गावरून दिंडी सोहळाही पार पडला.सोहळ्याची सांगता हभप योगेश जाधव-आळंदी यांच्या समाधी सोहळ्याच्या किर्तनाने करण्यात आली.यावेळी महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले.