कवी......... ✒️दिलीप महादार
🌱💥🌱💥🌱💥🌱💥🌱💥🌱
काल,होतं म्हणे! लक्ष्मीपूजन
हे!असलं कसलं,लक्ष्मीपूजन?
जर व्हायचं असेल,लक्ष्मीचं आगमन
तर त्या घरी हवं,शांततेचं वातावरण
पण,जीकडं पहावं तिकडं,धडामधूम
पशुपक्षी चीडीचूप,भितीनं घामाघूम
स्फोटांनी!भारत-माताच् गेली,पुरी हादरून
आली!इस्त्रायल युक्रेन युद्धाचीच,आठवण
लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीचा फोटो,पुजेला ठेवलात ना?
परंतु,आगमनावेळीच केलीत, लक्ष्मीची अवहेलना
हाकारे! नगारे वाजवत,हाकलतात जंगली पशूला
तसंच् फटाके फोडून,हाकलून लावलंत्,श्री.लक्ष्मीला
आज सकाळी,नेहमीप्रमाणेच फिरताना
नभी एकही नाही दिसला,पक्षी उडताना
वातावरणात भरून राहीलाय, विषारी वायू
वृद्धच् काय,घटेल देशाच्या तरुणाईचं आयू
सामाजिक संस्था सांगतायत,प्रदुषणाला रोखा
समस्त सजीवांनाच् जाणवतोय,जीवाचा धोका
देशाच्या अब्जावधी संपत्तीचा,क्षणार्धात भडका
तरीही या बरबादीवर, लाखो शुभेच्छांचा धडाका, भविष्यात होईलच सुरुवात प्रदुषणमुक्त,सण समारंभाची जोड हवी त्यास, शासनाच्या कडक, प्रामाणिक धोरणांची
बुद्धिमान माणसात, कधी ना कधी येणारच् आहे जागृती
आशा एकच्! लवकरात लवकर यावी, होण्याआधी माती.
काल लक्ष्मी पूजनावेळी, कर्णभेदी फटाके फुटत असतांना
जे सुचलं ते लिहून टाकलं, अस्वस्थ मनं, जाग्यावर नसताना
नम्र विनंती इतकीच् आहे, माझ्या सर्वधर्मी बांधवांना
कृपया नका म्हणू कुणी, दुखावल्या आमच्या भावना.
🙏🏻
दिलीप महादार
९९६०४९७१३३
