NCT NCT राजलक्ष्मी ज्वेलर्सला ग्राहकांची पसंती,खरेदीवर विविध ऑफर्स

राजलक्ष्मी ज्वेलर्सला ग्राहकांची पसंती,खरेदीवर विविध ऑफर्स

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- कवठेमहंकाळ शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे भारतीय स्टेट बँकेलगत असणाऱ्या तालुक्यातील सर्वात मोठे सुवर्ण दालन म्हणजे राजलक्ष्मी ज्वेलर्सला विविध प्रकारचे दागिने खरेदीसाठी ग्राहकांची चांगलीच पसंती मिळत असुन,येथे सोने चांदीच्या दागिण्याची अगदी रेलचेल असुन, येथे विविध प्रकारच्या दागिने खरेदीवर विविध ऑफर्स लावल्याने ग्राहकवर्ग याला चांगलीच पसंती देत आहे.                                                                          येथे दागिने घडविण्याची मंजूरी ही ५.९९ टक्क्या पासून सुरू होत असुन,जुनी सोन्याची मोडही १०० टक्के कोणतीही घट अथवा तूट न धरता घेतली जात आहे.त्याचबरोबर ५००००/- रुपयाच्या पुढील खरेदीवर पैठणी अथवा लक्ष्मीयंत्र ही आकर्षक भेटवस्तू दिली जात आहे.त्यामुळे हे दालन ग्राहकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे.                                     त्याचबरोबर येथे ग्राहकांच्यासाठी फायदेशीर अशी सुवर्ण संचय योजनाही उपलब्ध असल्याचे ज्वेलर्सचे सर्वस्वा दत्तात्रय जाधव यांनी सांगितले.दिवाळीच्या अगदी सुरुवातीपासूनच येथे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे.
फोटो :- कवठेमहांकाळ येथील राजलक्ष्मी ज्वेलर्समध्ये खरेदीसाठी ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे.फोटो- जालिंदर शिंदे