नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी (रामचंद्र कोरे-माळी):-कवठेमहांकाळ येथील नूतन कॉलेज ऑफ फार्मसी, कवठे महांकाळ येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत पुस्तक वाचन, वक्तृत्व स्पर्धा तसेच पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात आल्या.या उपक्रमांचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, विचार मांडण्याची कला विकसित करणे आणि सर्जनशीलता वृद्धिंगत करणे हा होता. विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.ह्या स्पर्धा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नूतन माळी मॅडम आणि सचिव डॉ. रामलिंग माळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आल्या होत्या. कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल पाटील सर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. नवनाथ कल्याणी सर, फिजिओथेरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. सेधू राजा सर, बीएचएमएस कॉलेजचे प्राचार्य डॉ. कोरे सर, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. भैरू माळी सर, तसेच फार्मसी विभागाचे प्रमुख (HOD) प्रा. प्रमोद चिकोडी सर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनातून विद्यार्थ्यांनी “स्वप्न पाहा आणि ते साकार करण्यासाठी प्रयत्न करा” हा संदेश आत्मसात केला.
