NCT NCT आज कवठेमहंकाळ येथे चिदंबर महास्वामी कल्याणोत्सव सोहळा

आज कवठेमहंकाळ येथे चिदंबर महास्वामी कल्याणोत्सव सोहळा

नवचैतन्य टाईम्स घाटनाद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- कवठेमहांकाळ येथील कमंडलू नदीलगत असणाऱ्या श्री क्षेत्र शिवचिदंबर महास्वामी मंदीरात श्री चिदंबर महास्वामींचा भव्यदिव्य आसा कल्याणोत्सव सोहळा होणार असून,यानिमित्त विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे याचा तमाम भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे मठपती चिदंबरदास गुरु गोविंद महाराज यांनी केले आहे.       या सोहळ्या निमित्ताने काल मंगळवार दिनांक २५ रोजी सकाळी जाते पुजन व बांगड्यांचा कार्यक्रम होऊन सायंकाळी ५.३० वाजता भव्यदिव्य सुवाद्यासह मिरवणूकीने श्रीचा गावदेव पार पडला.तदनंतर हळद व मेंहीदीचा कार्यक्रम संपन्न झाला.                             तर आज बुधवार दिनांक २६ रोजी सकाळी ११ वाजता व्याहींची भेट होऊन दुपारी १ वाजून ३ मिनिटांनी सनई चौघड्याच्या निनादत व शोभेच्या दारूच्या आतिषबाजीत चि सौ का सरस्वती माता व चि सौ का सावित्री माता यांच्याशी कल्याणोत्सव सोहळा संपन्न होऊन,यथोचित महाप्रसादाचे वाटप होणार आहे तरी याचा लाभ तमाम भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन चिदंबरदास गुरु गोविंद महाराज यांनी केले आहे.