NCT NCT अक्षय बर्गे यांचा वाढदिवस सातारा येथील एहसास मतिमंद मुलांचे बालगृहातील चिमुकल्या सोबत मोठ्या उत्साहात संपन्न

अक्षय बर्गे यांचा वाढदिवस सातारा येथील एहसास मतिमंद मुलांचे बालगृहातील चिमुकल्या सोबत मोठ्या उत्साहात संपन्न

नवचैतन्य टाईम्स  महाबळेश्वर प्रतिनिधी (शरद झावरे):- अक्षय नंदू बर्गे हे एका सामान्य कुटुंबातून आहेत गेल्या काही वर्षापासून ‘एहसास’ बालगृहात वाढदिवस साजरा करतात. 

मसूर येथील सामाजिक जाणिवेतून प्रेरित तरुण अक्षय नंदू बर्गे यांनी आपला वाढदिवस नेहमीप्रमाणे यंदाही समाजोपयोगी उपक्रमातून साजरा केला.

अक्षय बर्गे यांनी दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी सातारा येथील ‘एहसास’ मतिमंद मुलांचे बालगृह येथे भेट देत लहानग्या मुलांसोबत आपला वाढदिवस आनंदात साजरा केला.

या वेळी त्यांनी बालगृहातील मुलांना खाऊ वाटप, तसेच शालेय साहित्याचे वितरण केले. केक कापून मुलांसोबत आनंदाचे क्षण शेअर करत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न केला.

गेल्या काही वर्षांपासून अक्षय बर्गे हे आपला वाढदिवस अशाच सामाजिक उपक्रमांतून साजरा करत असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमास बालगृहाचे व्यवस्थापक, कार्यकर्ते तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते. समाजातील प्रत्येकाने अशा उपक्रमांतून आपले योगदान द्यावे, असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.या वेळी अक्षय बर्गे यांनी बालगृहातील मतिमंद मुलांना खाऊ वाटप करत त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवले. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेले शालेय साहित्य देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावला. या उपक्रमामुळे बालगृहातील मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

“वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे नव्हे, तर इतरांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण निर्माण करणे,” हा विचार अक्षय बर्गे यांच्या कृतीतून प्रकर्षाने दिसून येतो. त्यांच्या या समाजभानातून साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे.
एहसास बालगृहाच्या वतीने अक्षय बर्गे यांच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले. अशा सामाजिक जाणिवेतून केलेले उपक्रम समाजासाठी नक्कीच दिशादर्शक ठरतात.