NCT NCT भाजपा पुणे शहर चिटणीस समीर रुपदे यांना पितृशोक

भाजपा पुणे शहर चिटणीस समीर रुपदे यांना पितृशोक

नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी (अनंत कुलकर्णी):-सनसिटी येथील भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते व पुणे शहर चिटणीस श्री. समीर अनिल रुपदे यांचे वडील स्व. अनिल गोपाळ रुपदे यांचे आज पहाटे निधन झाले. ते 72 वर्षांचे होते.स्व. अनिल रुपदे हे गेल्या अनेक वर्षांपासून कसबा गणपती देवस्थानचे ट्रस्टी म्हणून कार्यरत होते. सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रामाणिकपणा व निष्ठेने कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विचार आणि कृतीतून आदर्श निर्माण केला.त्यांच्या निधनाने एक सुसंस्कृत, शांत आणि सेवाभावी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.