नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर (जालिंदर शिंदे) :- माननीय विकास (भाऊ) हाक्के फाऊंडेशन दुधेभावी आयोजित सिनेअभिनेते क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यु होम मिनिस्टर 'खेळ पैठणीचा, सन्मान नारी शक्तीचा' या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्या महीलांना विविध प्रकारची मोठी बक्षीसे दिली जाणार आहेत अशी माहिती फाऊंडेशनचे संस्थापक विकास (भाऊ) हाक्के यांनी घाटनांद्रे येथे दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की सदर कार्यक्रम हा गुरुवार दिनांक १ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता घाटनांद्रे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर होणार आहे.या स्पर्धेतील विजेत्या महीलांस प्रथम क्रमांकास ईलेक्टीक बाईक, द्वितीय क्रमांकास वॉशिंग मशीन, तृतीय क्रमांकास फ्रिज, चौथ्या क्रमांकास गिझर तर पाचव्या क्रमांकास ओहन अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित प्रत्येक महीलेस हामखस साडी भेट दिली जाणार आहे.या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे सिनेअभिनेते क्रांतीनाना मळेगावकर व टिव्ही स्टार बालगायिका सह्याद्री मळेगावकर हे करणार आहेत.

