नवचैतन्य टाईम्स वाई (प्रतिनिधी):-परमपूज्य म.गांधीजी,(बापूंजी,)आज तुम्ही हयात नसल्याने मला पोरक्या व अनाथ मुलांसारखे वाटत आहे.तुमच्या प्रसन्न हास्यमुद्रेने विश्वाला प्रसंन्न केले आहे. आज ते हास्य कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांना जमत नाही.बापूजी!तुमची साधी राहणी, आणि अहिंसात्मक विचार सरणीचा प्रभाव कायम टिकून आहे.जीवनात मला खूप फायदा झाला आहे. तुमचे साहित्य वाचून विचार समृध्द करतो आहे.जीवनात वरिष्ठांची मर्जीसाठी वाटेल ते प्रकार अवलंबण्याचे तंत्र जमले नाही. इतरांकडून अपमान होतील तेव्हा तुमची हास्यमुद्रा हृदयात जपतो होतो.त्या योगे माझ्यातील सहन शक्तीचे धूमारे वाढत होते.साध्या राहणीचा कानमंत्र सत्याचे प्रयोगात मिळाला. बापूजी! तुम्ही देशासाठी चंदनासारखे झिजलात.तसे तुमचे समकालीन अनेक देशभक्त होते. सर्वांचे उदिष्टही स्वातंत्र्य असे एकच होते.देशक्रांती सारख्या उठावातून अनेकजण फासावर गेले, काहींना जन्मठेप झाली. तेव्हा तुमचे हृदय देश बांधवांच्यासाठी व्याकूळ झाले होते. स्वातंत्र्य समरंगणात तुमची नैतिकता फारच वरच्या दर्जाची होती. तुमच्या अहिंसेने स्वातंत्र्य मिळू शकतं असा निश्चय करुन "चले जाव ,""करेंगे या मरेंगे "या क्रांत्या यशश्वी करुन दाखवल्या.इंग्रजांना सुध्दा तुमच्या बद्दल आदरयुक्त भीती वाटत होती. आता ते देशप्रेम व नैतिकतेचा फार मोठा अभाव जाणवतो आहे. तरीही तुम्ही माझे आदर्श आहात. नैतिकता माझ्या सहकाऱ्यांनी सोडली. माझा काहीही अपराध नसताना अपराधाचे खापर माझ्या वाट्याला अनेकदा आले.तेव्हा मी सर्वाधिक आतून गंभीर बनत होतो.तुमच्या चालण्यातील उत्साह, चपळपणा तत्परता अनुलक्षून ते सारे विसरुन पुढं गेलं पाहिजे हे तुमच्या पासून शिकलो.बापूजी,"सारे भारतीय तुम्हाला महात्मा असे संबोधतात.मानसे जन्माला येतात, लहानाची मोठी होतात. पुढे काहीही न करता मरण पावतात.त्यांच्या जगण्यातील कार्य व कर्तृत्वाला कसलीच झळाळी नसते. सत्याचे प्रयोगात कोणतेही गोष्ट लप वून ठेवली नाही.अहिंसा हेच खरे सामर्थ्य व साहित्य ठरले.बापूजी! तुमची नजर अत्यंत पवित्र व पारखी आहे.तुमच्या डोळ्यातील बुबळामधुन सर्वेश्वर डोकावतो आहे. असे मला अनेक वेळा वाटले.त्या नजरेत विश्वा बद्धलची सहानुभूती आहे.आज खालून वर पर्यंतच्या सर्वा़ची नजर द्वेषाने, सुढाने व अहंकाराने गढूळ झाली आहे.मग विश्वबंधुत्वाची भावना येणार कोठून? म्हणून बापू तुम्ही पुन्हा जन्माला या! बापूजी! तुमच्या वागण्यात व चालण्यात कसलीच तफावत नव्हती. एखाद्या शूर सेनापती प्रमाणे मीठाचा सत्याग्रह केला.इंग्रची साम्राज्याला शह दिला.प्रेमाने विश्वाचे अंतरंग बदलतो शकतो. हा तुमचा वैयक्तिक अनुभव विश्वमान्य झाला.सत्य,अहिंसा,अस्त्येय, ब्रह्मचर्य या मार्गाधारे जीवनप्रवास अनुभवला.तेजस्वी प्रार्थनेच्या बळावर आपण अनेक भारतीयांना संघटीत केले. सर्वांच्या अंत:करणात भक्तीभाव व राष्ट्रभक्तीचा अभ्यदय घडवून आणला. बापूजी! तुमची देशाविषयीची धारणा महत्वाची होती.अनेकांना ती समजली नाही. परंतू तुम्ही सूर्य आहात तुमची निंदा करणे म्हणजे समुद्रावर थुंकण्यासारखे आहे.अध्यात्मिक साधनेने तुम्ही दधीची ऋषी सारखे वृतस्थ जीवन जगलात.आता तसले चारित्र्य शोधून ही सापडत नाही. आधुनिक किर्तन, प्रवचनातील कोल्हेकुई ऐकताना विनोदाचा बाजार भरल्यासारखा वाटतो.या देशातील उमलत्यावयातील मुलांना शाळेत व घरात साने गुरुजींचे संस्कार केले जात नाहीत. वंदेमातरम् हा महा मंत्र पारतंत्र्यात वेद मंत्रांसार खा होता. त्यातील अर्थ व तेज लोकांना सांगण्यासाठी आपला आशीर्वाद मिळावाअसा आपल्या जवळ आग्रह धरत आहे. सुंदर वळण शिक्षण परंतु आज सारे शिक्षणक्षेत्रात धनलुब्ध लोकांनी खंडणीचे आगर बनवले आहे. आकारिक मूल्यांकनाने नवनिर्माण न होता.उदिष्टांना गालबोट लागलेले आहे. निरंतर शिक्षणाचा हा फार मोठा पराभव आहे.देशातील स्वच्छतेचा तुमचा सहभाग खेड्या कडे चला असा होता. ती ग्रामसुधारणा योजना चालू परिस्थितीत चित्ररथाची विचित्र प्रेत यात्रा काढून सजवली जाते आहे.बापूजी! बहुजन समाज आज प्रगतीपथावर आहे. तेथे आंबेड करी शक्ती आहे.दुसऱ्या बाजूला मराठाओपन समाज भिकेला लागलेला आहे.विद्वान ज्ञानी आहे .परंतू आरक्षणामुळे त्यांचे जीवन उध्वस्त झाले आहे.ते जातियतेचे व विषमतेचे विष नाहीसे करण्यासाठी बापूजी आपण पुन्हा जन्माला या!बापूजी! तुमचा मृत्यू ही तत्कालीन दुर्घटना आहे .तुम्हाला कॅन्सर, हृदय रोग, डोकेदु:खी अन्य पध्दतीने दवाखा न्यात मृत्यू झाला असता तर तुमच्या मृत्यूचे सौंदर्य वाढले नसते. उलट तुमच्यावर जो प्रसंग गुदरला ते एक तत्कालीन सूडाचे राजकारण होते. तुम्ही देशासाठी शहीद झालात. सर्वसामान्य माणसाच्या मृत्यू पेक्षा तुमचा मृत्यू ही सत्याची मोठी कसोटी होती.त्या सत्याला समोर जाण्यासाठी मला आपला दिव्य आशीर्वाद हवा आहे.
प्रा.संभाजी लावंड वाई

