नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- ढालगाव जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विकास हाक्के व नागज पंचायत समिती गणातील वामन कदम यांच्या प्रचारार्थ त्यांच्या समर्थक महिलांनी घाटमाथा परिसर चांगलाच पिंजून काढला असुन, त्यांचा 'घर टु घर' मतदारांना भेटण्यावर जोर आहे.प्रचारास कालावधी अगदीच कमी असल्याने यांनी वेगाने प्रचाराचा धुमधडाका लावला आहे. पतीसाठी सौभाग्यवतीनी चांगलीच कंबर कसली असून, यामध्ये विकास हाक्के यांच्या सौभाग्यवती सौ पुजा विकास हाक्के तर वामन कदम यांच्या सौभाग्यवती सौ वनीता वामन कदम यांनी चांगलीच प्रचाराची धुरा सांभाळली आहे. गाव,वाडी,वस्त्यावर प्रत्यक्ष भेटून त्या आपल्या पक्षाची व आपल्या उमेदवारांच्या भुमिका अगदी शताब्दीने पटवून देत आहेत.
यांच्या शोभत तिसंगीच्या सरपंच रोहीणी सावळे,पल्लवी जाधव,जेष्ठ नेत्या संगीता जाधव,घाटनांद्रेच्या दिव्या शिंदे, पवित्रा शिंदे,सरपंच अमर शिंदे,उपसरपंच सुनील कांबळे, तिसंगीचे तानाजी कदम,शरद जाधव,अर्जुन पाटील,युवानेते श्रीकांत नरळे,भानुदास हाक्के,आनंदा पाटील,दरीबा दुधाळ, लिंगाप्पा सरगरसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहकार्य सोबत असतात.
फोटो ओळी :- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) 'घर टु घर' प्रचार करताना सौ पुजा हाक्के,सौ वनीता कदम सोबत इतर


