नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):-मराठा सेवा संघ व कवठेमहांकाळ तालुका सकल मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने कवठेमहांकाळ येथे शनिवार दि.२८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत मराठा समाज वधु-वर व पालक परिचय सुचक मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संयोजक कैलास पाटील यांनी दिली. कवठेमहांकाळ येथील देशिंग रोड,यशवंत नगर परिसरातील कुमार पाटील यांच्या श्री सिध्दनाथ मल्टीपर्पज हॉल येथे शनिवार दिनांक २८ रोजी सकाळी १० ते २ यावेळेत मराठा समाज वधु-वर सुचक मेळावा होणार आहे.यामेळाव्यात नोंदणी फी नाममात्र दोनशे रूपये ठेवण्यात आली आहे.वधु-वरांनी येताना एक फोटो व बायोडाटा दाखल करावयाचा आहे.सकाळी १० वाजता नाव नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. तालुका सकल मराठा समाजाचे अध्यक्ष कैलास पाटील, महेश पाटील, चंद्रकांत पाटील, जी जी पाटील, विशाल शिंदे, चंद्रकांत पाटील आदीं सह सर्व पदाधिकारी मेळाव्याचे नियोजन करीत आहेत. इच्छूक वधु-वर व पालकांनी सकाळी दहा वाजता सिद्धनाथ मल्टीपर्पज हॉल मध्ये वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष कैलास पाटील यांनी केले आहे.
