नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी (रामचंद्र कोरे-माळी):-तासगांव तालुक्यातील येळावी येथे १९ फेब्रुवारी रोजी छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६१ बॉटल रक्त संकलन करण्यात आले. रक्त संकलन आदर्श ब्लड बँक सांगली यांनी केले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. दीप प्रज्वलन जिल्हा परिषद सदस्य अमित पाटील व पंचायत समिती सदस्य उमेश पाटील,प्रदीप पाटील, योगेश पाटील,संतोष पाटील,आबा मंगसुळे,ओंकार गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. येळावीतील युवक शुभम पाटील हे वर्षातून २ वेळा अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करून ते गरजू लोकांना मोफत रक्तपुरवठा करत असतात. आतापर्यंत त्यांनी 500 पेक्षा जास्त रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला आहे.समाजपयोगी उपक्रमामुळे त्यांचे व सहकारी रक्तदात्यांसह मित्र परिवाराचे कौतुक केले जात आहे.
